ind vs sa : पहिल्या कसोटीत शून्यावर आऊट झालेल्या रोहितला मोठा धक्का, आठ वर्षांनी नको ते घडलं!
Rohit Sharma out o zero : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया बॅकफूटला गेली आहे. कॅप्टन रोहित शर्मा आजच्या सामन्यातही फेल गेला असून त्याला भोपळाही फोडता आला नाही. यामुळे त्याच्या नावावर खराब विक्रमाची बरोबरी झाली आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात पहिलास कसोटी सामना सुरू आहे. सेंच्यरियनमध्ये हा सामना सुरू असून टीम इंडिया बॅकफूटला गेली आहे. आफ्रिकेचा डाव 408 धावांवर संपला असून त्यांच्याकडे 163 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडिया बॅटींगला उतरली असून फलंदाजांची मोठी परीक्षा असणार आहे. मात्र परत एकदा रोहिच शर्माने नांगी टाकली आहे. रोहितला परत एकदा कगिसो रबाडाने आऊट केलं. रोहित आऊट झाला मात्र त्याच्या नावावक एक वाईट विक्रमाची नोंद झाली आहे.
रोहित शर्मासाठी वाईट बातमी
रोहित शर्मा आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावातही फेल गेला. पहिल्या डावात 5 धावांवर आऊट होणारा रोहित दुसऱ्या सामन्यात शून्यावर आऊट झाला. रोहित कसोटीमध्ये तब्बल 8 वर्षांनी शून्यावर बाद झाला आहे. याआध रोहित 2015 साली शून्यावर माघारी परतला होता. कसोटी वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये रोहित पहिल्यांदाच शून्यावर आऊट झाला आहे.
रोहित रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 31 वेळा भोपळाही न फोडता आऊट झाला आहे. यासह रोहित सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होणारा भारताचा आठवा खेळाडू ठरला आहे. या यादीमध्ये झहीर खान हा टॉपला असून तो 43 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
शून्यावर सर्वाधिकवेळा आऊट होणार भारतीय खेळाडू
झहीर खान- 43, इशांत शर्मा- 41, हरभजन सिंग- 37, अनिल कुंबळे- 35, विराट कोहली- 34, सचिन तेंडुलकर- 34, जवागल श्रीनाथ- 32 ,वीरेंद्र सेहवाग- 31, रोहित शर्मा- 31
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर