IND vs SA | वर्ल्ड कप पराभवानंतर टीम इंडियामधील वातावरणाबाबत राहुल द्रविडने खरं काय ते सांगितलं, म्हणाला…
वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू नाराज झालेले दिसले होते. शेवटच्या सामन्यात म्हणजे फायनलमध्ये झालेल पराभवानंतर आता संघातील वातावरण कसं आहे? याबाबत राहुल द्रविडने सांगितलं आहे.
मुंबई : वन डे वर्ल्ड कप 2023 मधील फायनलमध्ये झालेला पराभव प्रत्येक भारतीयाच्या मनावर खोल जखम करून गेला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरलं होतं. या पराभवानंतर प्रत्येक खेळाडू आतून तुटलेल दिसला. भारतामध्येच येऊन टीम इंडियाला कांगारूंनी पराभूत केलं होतं. या पराभवानंतर पहिल्यांदा वरिष्ठ खेळाडू आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. त्याआधी ड्रेसिंग रूममधील वातावरण कसं आहे याबाबत कोच राहुल द्रविडने सांगितलं आहे.
काय म्हणाला राहुल द्रविड?
याआआधीसुद्धा असं झालं असून हे निराशाजनकआहे. पण तुम्ही आऊट झाल्यावर तुम्हाला दुसऱ्यावेळी बॅटींग करायचीच असते. त्या डावात चांगली कामगिरी करायची असते. प्रत्येक खेळाडू या गोष्टीमध्ये निष्णात असतो त्याला माहित असतं की पुढचा खेळ कसा सुधारायचा. तुम्ही तुमच्या दु:खाला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. क्रिकेटपटू असल्यावर तुम्हाला अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. जर तुम्ही दु:खाचा विचार करत बसलात तर त्याचा परिणाम तुमच्या पुढच्या सामन्यावर होऊ शकतो, असं राहुल द्रविड म्हणाला.
होय, खेळाडू निराश झाले होतो. पण सगळ्यांनी सर्व दु: ख मागे सोडलं आहे. आता आमच्या समोर काय आहे त्याचा विचार सर्व खेळाडू करत असल्याचं द्रविडने सांगितलं. टीम इंडियाच्या सराव सत्रानंतर राहुल द्रविड माध्यमांशी बोलला. यावेळी राहुलने वर्ल्ड कपमधील पराभवानंतर आता टीममधील वातावरण कसं आहे याबाबत सांगितलं आहे.
दरम्यान, टीम इंडियाकडून खेळण्यासाठी कोणत्याही खेळाडूला मोटिवेट करण्याची गरज पडणार नाही. संघामधील प्रत्येक खेळाडूचा मोटिवेशन लागेल असं मला वाटत नसल्याचं द्रविडने सांगितलं. टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरला सेंच्युरियन येथे होणार आहे.