IND vs SA : कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आर अश्विननं जानसेनला दिली थेट वॉर्निंग, परत असं केलं तर…
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. कसोटीच्या तिसऱ्या दिवसावर दक्षिण अफ्रिकेची मजबूत पकड आहे. एक विकेट मिळवण्यासाठी भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागत आहे. असं असताना आर अश्विनने 98 व्या षटकात मार्को जानसेनला इशारा दिला.
मुंबई : पहिल्या कसोटी सामन्यावर दक्षिण अफ्रिकेने मजबूत पकड मिळवली आहे. तर टीम इंडिया तिसऱ्या दिवशी बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता टीम इंडियासमोर कसोटी वाचवण्याचं मोठं आव्हान आहे. लंचपर्यंत दक्षिण अफ्रिकेनं 140 च्या पार आघाडी मिळवली होती. खेळपट्टी फिरकीला मदत करत नसताना आर अश्विन अचूक टप्प्याची गोलंदाजी करत आहे. तसेच त्याने कोएत्झी गेराल्ड बाद करत यशही मिळवलं. पण या सामन्याच्या 98 व्या षटकात आर अश्विनचं रौद्र रूप पाहायला मिळालं. एल्गर आणि जानसेन जोडीने सहाव्या गड्यासाठी 111 धाावंची भागीदारी आहे. त्यामुळे ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर होतं. यासाठी सर्वच गोलंदाज कसोशीने प्रयत्न करत होते. यावेळी गोलंदाजी करतना जानसेन आधीच क्रिझ सोडत असल्याचं आर अश्विनच्या लक्षात आलं आणि त्याने त्याला थेट मांकडची बाद करण्याचा इशारा दिला.
मार्को जानसेनला बाद करण्याची आर अश्विनला संधी होती. पण त्याला फक्त इशारा दिला आणि सावध केलं. या प्रसंगाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर 100 वं षटकात गेराल्ड कोएत्झीला तंबूचा रस्ता दाखवला. कोएत्झीला अचूक टप्प्याची गोलंदाजी करत सिराजच्या हाती झेल देऊन बाद केलं. ही जोडी फोडण्यात यश मिळाल्याने टीम इंडियाला दिलासा मिळाला.
A warning by Ashwin as Jansen trying to back too much. pic.twitter.com/0u5uCeudkH
— Johns. (@CricCrazyJohns) December 28, 2023
2019 आयपीएल स्पर्धेत आर अश्विनने जोस बटलरला मांकड पद्धतीने बाद केलं होतं. त्यानंतर बराच वाद रंगला होता. मात्र क्रिकेटच्या नियमात असल्याने आर अश्विनची पाठराखण केली होती. दुसरीकडे, जानसेनला बाद करणअयाची संधी असूनही त्याला फक्त इशारा देऊन अश्विननं सोडलं. खरं तर जानसेना पाय आणि बॅट दोन्ही बाहेर होतं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जानसेन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नंद्रे बर्गर
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीद्ध कृष्णा