संजू सॅमसनच्या फक्त 10 चेंडूत 60 धावा, 214 च्या स्ट्राईक रेटने केली खेळी

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात डरबनच्या मैदानात संजू सॅमसन नावाचं वादळ घोंगावलं. संजू सॅमसनने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सलग दुसरं शतक ठोकलं. बांगलादेशनंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी केली.

संजू सॅमसनच्या फक्त 10 चेंडूत 60 धावा, 214 च्या स्ट्राईक रेटने केली खेळी
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 10:26 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला टी20 सामना दक्षिण अफ्रिकेच्या डरबन मैदानात रंगला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या झटपट विकेट पडतील असं वाटत होतं. कारण खेळपट्टीचा अंदाज घेऊनच कर्णधार एडन मार्करमने हा निर्णय घेतला होता. पण अभिषेक शर्माची विकेट घेतल्यानंतर तसंच वाटत होतं. पण त्यानंतर संजू सॅमसन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांची आक्रमक खेळी पाहायला मिळाली. संजू सॅमसनने तर दक्षिणअफ्रिकन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. संजू सॅमसनने अर्धशतक 28 चेंडूत 5 षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने पूर्ण केलं. तेव्हा त्याने 182 च्या स्ट्राईक रेटने खेळी केली होती. त्यानंतर त्याने आपलं शतक अवघ्या 47 चेंडूत पूर्ण केलं. म्हणजेच पुढच्या 50 धावा करण्यासाठी फक्त 19 चेंडूची मदत घेतली. यावेळी त्याने 7 चौकार आणि 9 षटकार मारले होते. तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट हा 212.77 इतका होता. या शतकी खेळीसह संजू सॅमसन हा सलग दोन शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

संजू सॅमसनने यानंतरही आक्रमक खेळी कायम ठेवली होती. आणखी एक षटकार मारत षटकारांचं दशक पूर्ण केलं. मात्र आणखी प्रयत्न करताना फसला आणि पीटरच्या गोलंदाजीवर ट्रिस्टन स्टब्सने त्याचा सीमेवर झेल पकडला. यावेळी त्याने 50 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 107 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 214 होता. संजू सॅमसनने या खेळीत एकूण 10 षटकार मारले. म्हणजेच फक्त 10 चेंडूत 60 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅनसेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, न्काबायोमझी पीटर.

भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, आवेश खान.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.