मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या टीम इंडियाने दमदार सुरूवात केली आहे. टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतलेल्या आफ्रिकेला अवघ्या 55 धावांवर गुंडाळलं आहे. मोहम्मद सिराज याने परत एकदा एकट्याच्या दमावर सामना काढून दाखवला. सिराजच्या गोलंदाजीसमोर आफ्रिकन फलंदाज नतमस्तक झालेले पाहायला मिळाले. त्यासोबतच मुकेश कुमार यानेही शेवटी येत अवघे 2 ओव्हर दोन बॉल टाकत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
मुकेश कुमार याने दोन विकेट घेतल्या, यामध्ये केशव महाराज आणि कगिसो रबाडा यांना त्याने आऊट करत मोठा कारनामा आपल्या नावावर केला आहे. मुकेश कुमार याने दोन विकेट घेतल्या पण गड्याने एकही रन दिला नाही. एकही रन न देता विकेट घेणार मुकेश कुमार हा कसोटी क्रिकेटमधील तिसरा गोलंदाज ठरला आहे.
मुकेश कुमारच्या आधी 1959 मध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू रिची बेनॉड यांनी एकही धाव न देता तीन विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर 2021 साली जो रूट यानेही एकही धाव न देता दोन विकेट घेतल्या होत्या. आता मुकेश कुमार याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मुकेश कुमार याला पहिल्या सामन्यात संधी मिळली नव्हती, त्यानंतर आता सुरू असलेल्या कसोटीमध्ये त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आहे.
डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी
रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार