SA vs IND : टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका टी 20i मालिका, सामने टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार? जाणून घ्या
IND vs SA T20 Series Live Streaming : टीम इंडियाची युवा ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.
टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलनंतर पुन्हा एकदा आमनेसामने भिडणार आहेत. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20I मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहचली आहे. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 4 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी या मालिकेसाठी खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. तर एडन मारक्रम याच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची धुरा आहे. मालिकेला 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 15 तारखेला चौथा आणि अंतिम सामना होणार आहे. हे सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येतील? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20I सामने हे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नाही, तर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील. तसचे डीडी स्पोर्ट्स (फ्री डीश) चॅनेलवर सामन्याचा थरार अनुभवता येईल. तसेच या मालिकेतील सामने मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर लाईव्ह पाहता येतील. सामन्यांना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 30 मिनिटांआधी 9 वाजता टॉस होईल.
टी 20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 8 नोव्हेंबर, डरबन
दुसरा सामना, 10 नोव्हेंबर,
तिसरा सामना, 13 नोव्हेंबर, सेंच्युरियन
चौथा सामना, 15 नोव्हेंबर, जोहान्सबर्ग
8 नोव्हेंबरपासून हॉटस्टार नाही, जिओ सिनेमा एप
A new look Indian Team is set to take on the Proteas 🤩
Who will steal the spotlight in the #SAvIND T20I series? ⭐ Catch all the action live, starting November 8th on #JioCinema & #Sports18 👈#JioCinemaSports pic.twitter.com/lPRuLszllj
— JioCinema (@JioCinema) November 4, 2024
दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.
T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.