IND vs SA : तिसऱ्या टी20 साठी सूर्यकुमार यादवने काढला हुकूमाचा एक्का, फॉर्मात असलेल्या खेळाडूला संधी

चार सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी घेतली. कर्णधार सूर्यकुमार यादवने संघात एक बदल केला आहे.

IND vs SA : तिसऱ्या टी20 साठी सूर्यकुमार यादवने काढला हुकूमाचा एक्का, फॉर्मात असलेल्या खेळाडूला संधी
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 8:21 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकत 1-1 ने बरोबरी केली आहे. त्यामुळे या मालिकेचा निकाल आजच्या सामन्यावर अवलंबून आहे. आज सामना जिंकणारा संघ मालिका विजयासाठी प्रयत्न करू शकतो. तर हरणाऱ्या संघाला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी पुढचा सामना जिंकावा लागेल. अशा स्थितीत दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतील यात शंका नाही. या सामन्यासाठी टीम इंडियात एक बदल करण्यात आला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर आणि वाटेला फलंदाजी आल्यानंतर सांगितलं की, ‘ठीक आहे. प्रथम फलंदाजी करताना आम्ही गेल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. खेळाडूंनी आपल्या योजना स्पष्टपणे मांडल्या आहेत आणि ते अंमलात आणत आहेत. त्यामुळे मला खरोखर आनंद झाला आहे. त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की, मैदानात उतरा आणि आनंद घ्या. खेळाडूंनी माझे काम सोपे केले आहे. आमच्यात संघात एक बदल आहे . रमणदीपने संघात पदार्पण केलं आहे. आवेशने आमच्यासाठी चांगली कामगिरी केली पण दोन गोलंदाजांपैकी एकाला बलिदान द्यावे लागणार हे निश्चित होतं.’

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने सांगितलं की, ‘आम्ही पुन्हा प्रथम गोलंदाजी करणार आहोत. विकेट चांगली दिसते. अजूनही आम्ही सर्वोत्तम देत नाही. आम्ही हळूहळू प्रगती करत आहोत. गेल्या सामन्यात गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. फलंदाजांना मध्यभागी वेळ घालवायला हवा आणि खूप हताश होऊ नये. आमच्या फलंदाजीवर पूर्ण विश्वास आहे आणि आशा आहे की आम्ही आज रात्री काहीतरी खास करू.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुथो सिपामला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.