दक्षिण अफ्रिकेतील पराभवासाठी गोलंदाज कारणीभूत! कर्णधार रोहित शर्माने दोष देत दिलं असं कारण

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा याने संताप व्यक्त केला आहे. यावेळी पत्रकार परिषदेत रोहित शर्माने गोलंदाजांवर खापर फोडलं. तसेच प्रतिस्पर्धी गोलंदाजांकडून शिकण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर प्रॅक्टिस सामन्याती पिचवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

दक्षिण अफ्रिकेतील पराभवासाठी गोलंदाज कारणीभूत! कर्णधार रोहित शर्माने दोष देत दिलं असं कारण
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध गोलंदाजांनी काय चूक केली! कर्णधार रोहित शर्माने सर्वकाही सांगून टाकलं
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 5:17 PM

मुंबई : भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना तिसऱ्या दिवशीच संपला. दक्षिण अफ्रिकेत भारताचा पहिल्यांदाच इतका लाजिरवाणा पराभव झाला आहे. दक्षिण अफ्रिकेने एक डाव आणि 32 धावांनी भारताला पराभूत केलं. यामुळे सर्वच स्तरातून टीम इंडियावर टीका होत आहे. भारताने दक्षिण अफ्रिकेला तोडीस तोड उत्तर द्यायला हवं होतं असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. या पराभवामुळे भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही फटका बसला आहे. भारताची पहिल्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. तसेच स्लो ओव्हर रेटसाठी भारताचे दोन गुणही कापण्यात आले आहे. ठरलेल्या वेळेपेक्षा भारताने दोन षटकं कमी टाकली. एका षटकासाठी एक गुण अशी शिक्षा आहे. तसेच मॅच फीमधून दहा टक्के रक्कम कापली आहे. असं असताना पत्रकार परिषदेत रोहित शर्माने संताप व्यक्त केला. एकीकडे स्वत: सपशेल फेल ठरला असला तरी गोलंदाजांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

“गोलंदाजी करताना आम्ही काही चुका केल्या. 400 धावा होतील अशी विकेट नव्हती ही. आम्ही खूप साऱ्या धावा दिल्या. एका गोलंदाजावर आपण जास्त अवलंबून राहू शकत नाहीत. बाकी तीन गोलंदाजांना आपली भूमिका बजावणं तितकंच महत्त्वाचं आहे. समोरच्या संघाने कशी गोलंदाजी केली. त्यातून आपण शिकलं पाहीजे.” अशी तंबी कर्णधार रोहित शर्मा याने गोलंदाजांना दिली. दरम्यान भारतीय गोलंदाजीच्या ताफ्यात आवेश खानची एन्ट्री झाली आहे. मोहम्मद शमीच्या जागी त्याची निवड झाली आहे.

“गेल्या पाच सहा वर्षापासून सराव सामने खेळत आहोत. फर्स्ट क्लास सामने खेळण्याचाही प्रयत्न केला. तशी विकेट इथे असते  तशीच्या तशी विकेट प्रॅक्टिस सामन्यात मिळत नाही. प्रॅक्टिस विकेटमध्ये चेंडू गुडघ्याच्या वर येत नाही आणि इथे चेंडू डोक्यावरून उसळी खात निघून जातो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आम्ही रणनिती आखली होती. जर तसेच पिच सरावासाठी मिळाले असते गोष्ट वेगळी असती. आम्ही मागच्या तीन चार टूरमध्ये पाहिलं आहे की, जशी खेळपट्टी सामन्यात असते तशी खेळपट्टी प्रॅक्टिस सामन्यात नसते. तसेच गोलंदाजही 120 ते 125 च्या वेगाने टाकणारे असतात. यापेक्षा आम्ही आमच्या गोलंदाजांना खेळू आणि आपल्या पद्धतीने खेळू.”, असं कारणंही रोहित शर्माने दिलं आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.