IND vs SA TEST : एका विजयानेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत दक्षिण अफ्रिका अव्वल स्थानी, टीम इंडियाला बसला फटका

भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेने आपल्या खिशात घातला आहे. या विजयासह दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या विजयासह दक्षिण अफ्रिकेने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे.

IND vs SA TEST : एका विजयानेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत दक्षिण अफ्रिका अव्वल स्थानी, टीम इंडियाला बसला फटका
IND vs SA TEST : दक्षिण अफ्रिकेने गाठलं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गाठलं पहिलं स्थान, भारताचं अंतिम फेरीचं गणित बिघडलं
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 8:47 PM

मुंबई : दक्षिण अफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभूत केलं आहे. दुसऱ्या डावात टीम इंडियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. विराट कोहली वगळता एकही फलंदाज तग धरू शकला नाही. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच सामना गमवण्याची वेळ आली. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर यांच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र दुसऱ्या डावात क्रीडारसिकांचा अपेक्षाभंग झाला. दक्षिण अफ्रिकेने भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला. एका विजयाने दक्षिण अफ्रिकेला मोठा फायदा झाला आहे. सातव्या स्थानावरून थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. तर भारताच्या विजयी टक्केवारीत घसरण झाल्याने अंतिम फेरीची वाट बिकट झाली आहे. टीम इंडियाचं पहिलं स्थानही गेलं आहे आणि थेट पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी टीम इंडियाला खूप मेहनत घ्यावी लागेल. तसेच मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान असेल.

दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवारी 100 असल्याने गुणतालिकेत अव्वल स्थान आहे. तर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सामन्यातील निकाल न लागल्याने पाकिस्तान दोन नंबरला कायम आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेश संयुक्तिकरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत. तर भारताची विजयी टक्केवारी 67 पेक्षा कमी 44.44 टक्के झाली आहे. त्यामुळे पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर ऑस्ट्रेलिया 41.67 टक्क्यांसह सहाव्या, 16.67 टक्क्यांसह वेस्ट इंडिज सातव्या, तर 15 टक्क्यांसह इंग्लंड आठव्या स्थानावर आहे.

WTC_Point_Table

IND vs SA TEST : दक्षिण अफ्रिकेने गाठलं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गाठलं पहिलं स्थान, भारताचं अंतिम फेरीचं गणित बिघडलं

नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेने जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात टीम इंडियाने सर्व बाद 245 धावा केल्या. त्या बदल्यात दक्षिण अफ्रिकेने सर्वबाद 408 धावा केल्या आणि 163 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढतानाच टीम इंडियाचा संपूर्ण संघ तंबूत परतला. टीम इंडियाला फक्त 131 धावा करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नंद्रे बर्गर

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.