IND vs SA, 1st t20, Playing 11 : आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T-20 मालिकेतील पहिला सामना, धोनीचा मोठा विक्रम ऋषभ मोडेल, पण इतिहास रचू शकणार नाही, नेमकं काय कारण, जाणून घ्या…
ऋषभ पंत हा T20 क्रिकेटमधला भारताचा दुसरा सर्वात तरुण कर्णधार ठरणार आहे.
नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA)यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात मैदानात उतरताच ऋषभ (Rishabh pant) हा महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) या मालिकेसाठी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली होती. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वीच हा सलामीवीर जखमी झाला आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि निवड समितीनं ऋषभ पंतची नव्यानं नियुक्ती केली आहे. ऋषभ पंत हा T20 क्रिकेटमधला भारताचा दुसरा सर्वात तरुण कर्णधार ठरणार आहे हे विशेष. तो 24 वर्षे 249 दिवस वयाच्या क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. दुसरीकडे जर आपण त्याचे मार्गदर्शक आणि भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या एमएस धोनीबद्दल बोललो तर त्याने 26 वर्षे आणि 68 दिवसांच्या वयात टीम इंडियाची धुरा सांभाळलीय.
तरुण कर्णधार होण्याचा विक्रम
T20 क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात तरुण कर्णधार होण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. त्याने वयाच्या 23 वर्षे आणि 197 दिवसात भारतीय संघाची धुरा सांभाळली. ऋषभ पंतबद्दल बोलायचं झालं तर तो T20 क्रिकेटमधला भारताचा 8वा कर्णधार ठरला आहे. त्याच्यापूर्वी वीरेंद्र सेहवाग 1, एमएस धोनी 72, सुरेश रैना 3, अजिंक्य रहाणे 2, विराट कोहली 50, रोहित शर्मा 28 आणि शिखर धवन यांनी 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व केलंय.
सर्वात तरुण कर्णधार
बीसीसीआय आणि निवड समितीनं ऋषभ पंतची नव्यानं नियुक्ती केली आहे. ऋषभ पंत हा T20 क्रिकेटमधला भारताचा दुसरा सर्वात तरुण कर्णधार ठरणार आहे हे विशेष. तो 24 वर्षे 249 दिवस वयाच्या क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे
दोन्ही संघाचे खेळाडू जाणून घ्या
भारतीय संघ : ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (w/c), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युझवेंद्र चहल, दीपक हुडा, व्यंकटेश अय्यर, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, उमरान मलिक
दक्षिण आफ्रिकेचा संघ : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार ), रीझा हेंड्रिक्स, रस्सी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, केशव महाराज, एनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, वेन पारनेल, वेन पारनेल एनगिडी, हेन्रिक क्लासेन, मार्को जेन्सन, ट्रिस्टन स्टबसो