Umran Malik : उमरान मलिकने श्रीलंका विरुद्ध तोडले सर्व रेकॉर्ड, पहिल्याच वनडेत धमाका

उमरान मलिकने (Umran Malik) नुकत्याच श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 155 किमी वेगाने बॉल टाकत रेकॉर्ड केला होता.

Umran Malik : उमरान मलिकने श्रीलंका विरुद्ध तोडले सर्व रेकॉर्ड, पहिल्याच वनडेत धमाका
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 12:02 AM

Umran Malik Fastest Ball : जम्मू एक्सप्रेस उमरान मलिकने (Umran Malik) श्रीलंका विरुद्धच्या (IND vs SL) पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्वत:चाच एक रेकॉर्ड ब्रेक केला आहे. उमरान गुवाहाटीच्या (Guwahati) सामन्यात टीम इंडियाकडून 156 किमी वेगाने (Fastest Delivery By Indian Pacer) बॉल टाकून स्वत:चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. याआधीत उमरानने 155 च्या स्पीडने बॉल टाकला होता. (ind vs sl 1st odi jammu express umran malik break own record fastest delivery by team india at guwahati)

उमरानने स्वत:लाच पछाडलं

उमरानने नुकत्याच श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 155 किमी वेगाने बॉल टाकत रेकॉर्ड केला होता. याआधी टीम इंडियाकडून फास्टेस्ट डिलीव्हरीचा मान हा जवागल श्रीनाथच्या नावावर होता. आता उमरानच्या आसपासही कोणताही गोलंदाज नाही. श्रीनाथने 154.5 च्या स्पीडने बॉल टाकला होता. तर जसप्रीत बुमराहने 153.36 च्या स्पीडने बॉल टाकला आहे. मोहम्मद शमीने 153. 3 या स्पीडने डिलीव्हरी केली आहे.

हे सुद्धा वाचा

उमरानने खऱ्या अर्थाने आयपीएलच्या 15 व्या मोसमातून सर्वांच लक्ष वेधून घेतलं. उमरानने आयपीएल 2022 मध्ये 157 च्या स्पीडने बॉल टाकला होता. या स्पीडने बॉल टाकणारा उमरान हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. काही दिग्गजांनी हे सुद्धा मान्य केलंय की उमरान वेगवान स्पीडने बॉल टाकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करु शकतो.

उमरान मलिकने याआधी टीम इंडियाचं 5 वनडे आणि 6 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. या एकदिसीय सामन्यांमध्ये उमरानने 6 च्या इकॉनॉमी रेटने 7 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी 20 मध्ये 10.9 च्या इकॉनॉमीने 9 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. उमरानच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर तो आगामी एकदिवसीय वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्यासाठीचा प्रबळ दावेदार समजला जात आहे.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, कसून रजिथा आणि दिलशान मदुशंका.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.