IND vs SL 1st ODI : गडी एकटा पुरून उरला! श्रीलंकेच्या 21 वर्षाच्या खेळाडूने भारताचा विजय हिसकावला, कोण आहे तो?
IND vs SL 1st ODI : भारत आणि श्रीलंकेमधील पहिल्या वन डे सामना टाय झाला. लंकेच्या गोलंदाजांनी तोंडापाशी आलेला विजय काढून घेतला. भारताला श्रीलंका संघातील 21 वर्षातील पोराने हाराकिरीला आणलं, कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
भारत आणि श्रीलंकेमधील पहिला वन डे सामना टाय झाला. श्रीलंका संघाने भारताला 231 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारत एकदम मजबूत स्थितीत होता मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी आपली सर्व ताकद लावली अन् सामन्यात कमबॅक केलं. भारताला विजयासाठी 14 बॉलमध्ये 1 रनची गरज होती तराही सामना टाय झाला. श्रीलंकेचा कॅप्टन चरिथ असलंका याने दोन बॉलवर शिवम दुबे आणि अर्शदीप सिंहची विकेट घेत सामना टाय केला. पण त्याच्यासोबतच एक असा 21 वर्षाचा खेळाडू ज्याच्यामुळे भारताचा विजय लांबला आणि अखेर सामना बरोबरीत सुटला.
कोण आहे तो 21 वर्षाचा खेळाडू?
21 वर्षाचा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून दुनिथ वेल्लालगे आहे. ज्यावेळी श्रीलंका संघाच्या झटपट विकेट जात होत्या त्यावेळी पठ्ठ्याने मैदानात तळ ठोकला. भारताच्या एकाही गोलंदाजाला शेवटपर्यंत आपली विकेट न देता त्यांच्याकडूनच धावा वसूल केल्या. वेल्लालगे याने 65 बॉलमध्ये 67 धावा केल्या, यामध्ये त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले.
दुनिथ वेल्लालगे याने 9 ओव्हरमध्ये 39 धावा देत शुबमन गिल आणि के. एल. राहुल यांच्या दोन विकेट घेतल्या. त्यामुळे भारत पिछाडीवर पडला. जर दुनिथ याने टिकून राहत फलंदाजी केली नसती तर श्रीलंकेला २३० धावांचा टप्पा गाठता आला नसता. त्यामुळे चरिथ असालंका याच्या दोन विकेट जितक्या महत्त्वाच्या होत्या त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची खेळी वेल्लालगे याने केली.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन: चारिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटीकपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो आणि मोहम्मद शिराज.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.