INDvSL, 1st Odi : रोहित-विराटचं कमबॅक, कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन?
पहिल्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन (INDvSL 1st Odi) कशी असू शकते, हे आपण जाणून घेणार आहोत.
गुवाहाटी : श्रीलंकेला टी 20 मालिकेत पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आता एकदिवसीय (Odi Series) मालिकेसाठी सज्ज आहे. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात 10 जानेवारीपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा गुवाहाटीत (Guwahati) होणार आहे. या मालिकेतून अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं (Virat Kohli) कमबॅक झालंय. त्यामुळे पहिल्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, हे आपण जाणून घेणार आहोत. (ind vs sl 1st odi team india probable playing eleven rohit sharma shubaman gill at guwahati)
ओपनिंग कोण करणार?
रोहितने पहिल्या सामन्यातून द्विशतकवीर इशान किशनला (Ishan Kishan) टीमबाहेर ठेवलंय. त्याच्या जागी शुबमन गिलला (Shubaman Gill) संधी दिली आहे. तर केएल राहुललाही (K L Rahul) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. इशान किशन नसल्याने विकेटकीपरची भूमिकाही केएल बजावू शकतो. अशात रोहितसोबत ओपनिंग शुबमन करणार की केएल हे सामन्यानंतरच समजेल.
ओपनिंग जोडीनंतर मिडल ऑर्डरची जबाबदारी ही विराट कोहली, श्रेयस अय्यर यांच्या खांद्यावर असेल. ऑलराउंडर खेळाडू म्हणून टीम इंडिया हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल अशा 2 ऑलराउंडरसोबत उतरु शकते. फिरकी गोलंदाजीची जबाबदारीही चायनामॅन बॉलर कुलदीप यादव आणि अक्षरकडे राहू शकते. तर वेगवान गोलंदाजीचा किल्ला हा मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक ही तिकडी सांभाळू शकते. मात्र खरी प्लेइंग इलेव्हन कशी असेल ही काही तासांनी स्पष्टच होईल.
सामना कुठे खेळवण्यात येणार?
सामन्याचं आयोजन हे गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होईल.
पहिल्या सामन्यासाठी संभावित भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.