IND vs SL, 2nd ODI : टीम इंडियाचा 4 विकेट्सने विजय, केएल राहुलचं झुंजार अर्धशतक
केएल राहुल टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. टीम इंडियाने श्रीलंकेवर 4 विकेट्सने विजय मिळवला. यासह मालिकाही जिंकली.
कोलकाता : केएल राहुल याने केलेल्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने विजयासाठी दिलेले 216 धावांचे आव्हान टीम इंडियाने 6 विकेट्सच्या मोबदल्यात 43.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. केएल टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. केएलने नाबाद 64 धावांची निर्णायक खेळी केली.
टीम इंडियाने मालिका जिंकली
A victory by 4️⃣ wickets for #TeamIndia in the second #INDvSL ODI here in Kolkata and the series is sealed 2️⃣-0️⃣ ??
Scorecard ▶️ https://t.co/jm3ulz5Yr1 @mastercardindia pic.twitter.com/f8HvDZRJIY
— BCCI (@BCCI) January 12, 2023
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दसून शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस, अविष्का फर्नांडो, चारित असलांका, धनंजय डी सिल्वा, नुवानिदु फर्नांडो, वानिंदु हसरंगा, चामिका करुणारत्ने, दुनिथ वेलेज, लाहिरू कुमारा आणि कसुन रजिता.
टीम इंडिया प्लेइंग इलेवन : रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि उमरान मलिक.