Video : रोहित शर्मा Live सामन्यात भडकला, खेळाडूला मारण्यासाठी धावत गेला आणि…

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्याच खेळाडूला मारण्यासाठी धावल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर होत आहे. त्यामुळे त्याच्या कृतीची चर्चा रंगली आहे. एकच चुकी वारंवार केल्याने रोहित शर्माला राग अनावर झाला आणि त्याने खेळाडूला मारण्यासाठी धाव घेतली.

Video : रोहित शर्मा Live सामन्यात भडकला, खेळाडूला मारण्यासाठी धावत गेला आणि...
Image Credit source: (फोटो- Robert Cianflone/Getty Images)
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 6:26 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. या मैदानावर 200च्या वर धावा करणं कठीण आहे. तसेच फिरकीला मदत करणारी खेळपट्टी असल्याने भारतीय क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे. कारण श्रीलंकेने पहिल्या सामन्यात फक्त 230 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताला गाठता आलं नाही आणि सामना बरोबरीत सुटला. आता श्रीलंकेने याच मैदानात त्याच खेळपट्टीवर 50 षटकात 8 गडी गमवून 240 धावा केल्या आहेत आणि 241 धावा जिंकण्यासाठी दिल्या आहेत. त्यामुळे पहिल्या सामन्याच्या तुलनेत 10 धावा जास्त आहेत. असं असताना हे आव्हान भारतीय फलंदाजांना पेलवेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. प्रत्येकवेळी तसंच होतं असं नाही. कदाचित हा सामना लवकरही संपू शकतो. दुसरीकडे, या सामन्यात रोहित शर्माचं आक्रमक पण मजेशीर रूप पाहायला मिळालं. एकच चुकी वारंवार केल्याने रोहित शर्मा संतापला आणि स्वत:ला रोखू शकला नाही.

कर्णधार रोहित शर्मा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याच्यावर मजेशील राग काढला. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करताना अनेकदा धाव घेताना चुकला आणि गोलंदाजी करताना थांबला. श्रीलंकेच्या 33व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने असं तीनवेळा केलं. त्यामुळे स्लिपला उभा असलेला कर्णधार रोहित शर्मा वैतागला. तसेच मजेशीर अंदाजात त्याच्या मागे मारण्यासाठी धावला. खरं तर हा मैदानातील एक मजेशीर प्रकार होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने जबरदस्त गोलंदाजी केली 10 षटकात एक निर्धाव षटक टाकत 3 गडी बाद केले. तसेच 3 च्या इकोनॉमी रेटने 30 धावा दिल्या.

या मालिकेच्या पहिल्या सामन्यातही असंच काहीसं झालं होतं. वॉशिंग्टन सुंदरने 29वं षटक टाकताना एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केली. पण पंचांनी त्याला बाद दिलं नाही. त्यामुळे डीआरएससाठी तो कर्णधार रोहित शर्माकडे पाहायला लागला. तेव्हा रोहित शर्माने विकेटकीपर केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदरकडे पाहात म्हणाला, ‘मला काय माहिती बॉल कुठे लागला ते. मला का बघतोय.’

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.