IND vs SL Day-Night Test : जयंतच्या जागी अक्षर/सिराजला संधी, पाहा दोन्ही संघांच्या संभाव्य Playing XI
मोहाली कसोटीनंतर चेतेश्वर पुजाराच्या तिसऱ्या आणि अजिंक्य रहाणेच्या पाचव्या नंबरवर हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांनी आपली दावेदारी पक्की केली आहे. हनुमाने 58 धावांची संयमी खेळी केली, तर पंतने बेफाम फटकेबाजी करीत 96 धावा फटकावल्या होत्या.

बंगळूरु : बंगळुरुतल्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chennamma Stadium) आजपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या दिवस रात्र कसोटी (Day Night Test) सामन्यात 100 टक्के क्षमतेनं प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे. विराट कोहलीने (Virat kohli) त्याचं अखेरचं (कारकीर्दीतील 70 वं) शतक डे-नाईट कसोटीतच झळकावलं होतं. तसेच बंगळुरुचं एम. चिन्नास्वामी मैदान म्हणजे विराटसाठी दुसरं होम ग्राऊंडच आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये याच मैदानात खेळवलेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारताने एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात विराटनं 136 धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर 28 डावांमध्ये विराट कसोटी शतक झळकावू शकलेला नाही. यापैकी 6 डावांमध्ये कोहलीनं 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. जानेवारीत केप टाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उभारलेली 79 धावांची खेळी ही त्याची सर्वाधिक धावांची खेळी ठरली. विराटनं मोहालीमध्ये सामन्यात 45 धावा काढल्या होत्या. आता श्रीलंकेसमोर विराटला त्याच्या 71व्या शतकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगलं वातावरण आहे.
मोहालीतील पहिल्या कसोटीत एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या टेबलमध्ये भारताने पाचवे स्थान निश्चित केले आहे, त्यानंतर आता टीम इंडिया बंगळुरूमधील विजयासह गुणतालिकेत पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्माचा हा 400 वा सामना असेल, तर कोहलीची नजर त्याच्या 71 व्या शतकावर असेल.
विहारी-पंतच्या जागा निश्चित
मोहाली कसोटीनंतर चेतेश्वर पुजाराच्या तिसऱ्या आणि अजिंक्य रहाणेच्या पाचव्या नंबरवर हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांनी आपली दावेदारी पक्की केली आहे. हनुमाने 58 धावांची संयमी खेळी केली, तर पंतने बेफाम फटकेबाजी करीत 96 धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे विहारी आणि पंत यांचे क्रमांक कायम राहतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सातव्या क्रमांकावर उतरून नाबाद 175 धावा फटकावणाऱ्या रवींद्र जडेजाने अपेक्षा उंचावल्या आहेत. रविचंद्रन अश्विननेही त्याला तोलामोलाची साथ दिली होती.
The glistening ? in all it’s glory! #TeamIndia | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/X60i2JQH6a
— BCCI (@BCCI) March 12, 2022
संघात एक बदल अपेक्षित
डे-नाईट कसोटी सामन्यात अंतिम 11 खेळाडूंची निवड करताना फिरकीपटू जयंत यादवच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेल किंवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. मोहालीत श्रीलंकेचे फलंदाज झगडत असतानाही जयंत प्रभाव पाडू शकला नव्हता. दोन्ही डावांतील 17 षटकांमध्ये त्याला एकही बळी मिळाला नाही. अहमदाबादला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्यात अक्षरने 11 बळी मिळवले होते. त्यामुळे अक्षरचे पारडे जड मानले जात आहे; परंतु खेळपट्टीवर गवत असल्याने सिराजलाही संधी मिळू शकते. मोहालीत जडेजाने 9 आणि अश्विनने 6 बळी घेतले होते.
भारताची संभाव्य Playing 11
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज/अक्षर पटेल
IND vs SL Day-Night Test : जयंतच्या जागी अक्षर/सिराजला संधी मिळण्याची शक्यता #INDvsSL #RohitSharma? #INDvSL #PinkBallTest #ViratKohli? pic.twitter.com/sDSZnmONv6
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 12, 2022
श्रीलंकेची संभाव्य Playing 11
दिमुथ करुणारत्ने(कर्णधार), लाहिरू थिरिमाने, दिनेश चांडिमल, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला, सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, प्रवीण जयविक्रमा, विश्वा फर्नांडो
#TeamIndia have arrived here at the M Chinnaswamy Stadium, Bengaluru ?#INDvSL | @Paytm pic.twitter.com/W5Eecsneeg
— BCCI (@BCCI) March 12, 2022
इतर बातम्या
IND VS SL: कुलदीप यादवला संधी न देताच बाहेर का केलं? जसप्रीत बुमराहने दिलं अजब उत्तर
IPL 2022: लखनौचे 7.5 कोटी रुपये पाण्यात, मॅच विनर खेळाडूला जोफ्रा आर्चरसारखी दुखापत
IND vs WI: वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध भारत अजिंक्य, आकडे यावेळी बदलणार?