Video : तिसऱ्या सामन्यात मोठा अपघात, खेळाडूंची एकमेकांना जोरदार धडक

टीम इंडियाच्या बॅटिंगदरम्यान 43 व्या ओव्हरमधील 5 व्या ओव्हरमध्ये हा घटना घडली. विराट कोहली याने स्केवअर लेगच्या दिशेने पूल शॉट मारला. हा फटका रोखण्याच्या प्रयत्नात सर्व काही झालं.

Video : तिसऱ्या सामन्यात मोठा अपघात, खेळाडूंची एकमेकांना जोरदार धडक
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 7:26 PM

तिरुवअनंतपूरम : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरी वनडे मॅचमध्ये मोठा अपघात झाला आहे, सामन्यात श्रीलंकेचे दोन खेळाडू फिल्डिंग करताना एकमेकांना जोरात धडकले. बाउंड्री अडवण्याच्या प्रयत्नात जेफरी वेंडरसे आणि अशेन बंडारा या दोघांची जोरदार धडक झाली. या धडकेमुळे बंडाराच्या गुडघ्याला मार लागला आहे. बंडाराला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आलं.

नक्की काय झालं?

टीम इंडियाच्या बॅटिंगदरम्यान 43 व्या ओव्हरमधील 5 व्या ओव्हरमध्ये हा घटना घडली. विराट कोहलीने स्केवअर लेगच्या दिशेने पूल शॉट मारला. हा बॉल बाऊंड्री जाण्यापासून अडवण्यासाठी डीप स्केवअर लेगवरुन वेंडरसे आणि डीप मिड विकेटवरुन बंडारा जोरात धावात आले. बॉल अडवण्याच्या प्रयत्नात हे दोघे एकमेकांना येऊन धडकले.

हे सुद्धा वाचा

बंडाराने बॉल अडवण्यासाठी पायाने घसरत गेला. याच दरम्यान वेंडरसे येऊन बंडारावर येऊन धडकला. बंडाराचा गुडघा हा वेंडरसेच्या पोटावर लागला. बंडाराला खूप मार लागला. त्यामुळे बंडाराला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आलं.

श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये जोरदार धडक

या सर्व दरम्यान श्रीलंकेच्या खेळाडूंसह टीम इंडियाचं वैद्यकीय पथकही मैदानात होतं. या अशा घटनेमुळे खेळाडूंसह चाहतेही चिंतेत दिसत होते. यानंतर या दोघांच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये धनंजय डिसिल्वा आणि डुनिथ वेल्लालेगे यांचा समावेश करण्यात आला आहे. हे दोघे मैदानात आल्यानंतर सामना पुन्हा सुरु झाला.

श्रीलंकेला 391 धावांच आव्हान

शुबमन आणि विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 391 धावांच आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 390 धावा केल्या. शुबमन आणि विराट व्यतिरिक्त टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांनी 42 आणि 38 धावांचं योगदान दिलं.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि वॉशिंगटन सुंदर.

श्रीलंका प्लेइंग XI : दसुन शनाका (कॅप्टन), अविष्का फर्नांडो, एन. फर्नांडो, कुसल मेंडिस, आसेन बंडारा, चरिथ असालंका, वानिंदु हसारंगा, जेफरी वेंडरसे, कसुन रजित, चामिका करूणारत्ने आणि लाहिरू कुमारा.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.