शुबमन गिल याचा श्रीलंका विरुद्ध धमाका, ठोकलं शानदार शतक
शुबमन गिल याने श्रीलंका विरुद्ध्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकलं. याआधी पहिल्या 2 सामन्यात गिलने अनुक्रमे 70 आणि 21 धावांची खेळी करत आपली दावेदारी सिद्ध केली होती.
तिरुवअनंतपूरम : टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने अखेर श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक ठोकलंय. शुबमन पहिल्या वनडेत शतक ठोकता आलं नव्हतं. मात्र गिलने तिच चूक तिसऱ्या सामन्यात न करता शतक साजरं केलं. शुबमनच्या वनडे क्रिकेटमधील हे दुसरं शतक ठरलं. शुबमनने हे शतक 89 बॉलमध्ये 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. या दरम्यान शुबमनचा स्ट्राइक रेट 112.36 इतका होता.
शुबमनने त्याआधी 52 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पुढील 37 चेंडूत 48 धावा ठोकत शतकाला गवसणी घातली. शुबमन शतक ठोकल्यानंतर आणखी निर्धास्तपणे खेळू लागला. शुबमनला मोठी खेळी साकारण्याची संधी होती. मात्र शुबमन 116 धावांवर बोल्ड झाला. शुबमनने एकूण 97 बॉलमध्ये 14 फोर आणि 2 सिक्स मारले.
दरम्यान त्याआधी शुबमनला श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक करण्याची संधी होती. मात्र ती संधी थोडक्यात हुकली. शुबमन त्या सामन्यात 70 धावांवर आऊट झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 21 धावा करुन माघारी परतला. शुबमनला पहिल्या 2 सामन्यात चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र ती खेळी मोठ्या आकड्यात बदलण्यात शुबमनला यश आलं नाही. पण शुबमनने तिसऱ्या सामन्यात शतक ठोकलंच. दरम्यान शुबमनने या शतकासह सलामी फलंदाजासाठी दावा ठोकलाय.
गिलची विक्रमाला गवसणी
दरम्यान शुबमनने या दुसऱ्या एकदिवीय शतकासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. गिल वनडेत 55 च्या सरासरीने आणि 100 च्या स्ट्राईक रेट शतक किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच श्रीलंका विरुद्ध वनडे शतक लगावणारा युवा भारतीय फलंदाज ठरला आहे.
गिलने श्रीलंका विरुद्ध वयाच्या 23 वर्ष 129 दिवशी शतक ठोकलंय. याबाबतीत त्याने गौतम गंभीरला पछाडलं आहे. गंभीरने वयाच्या 24 वर्ष 23 व्या दिवशी ही कामगिरी केली होती. तर याबाबतीत अजूनही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनने टीम इंडियाकडून वयाच्या 21 वर्ष 350 व्या दिवशी शतक ठोकलं होतं.
भारताची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर.
श्रीलंकेची प्लेइंग XI: अविष्का फर्नांडो, एन. फर्नांडो, कुसल मेंडिस, आसेन बनडारा, चरिथ असालंका, दसुन शनाका (कॅप्टन), वानिंदु हसारंगा, जेफरे वॅनडरसे, कसुन रजित, चामिका करूणारत्ने, लाहिरू कुमारा.