Virat Kohli : विराट कोहली याचा धडाका सुरुच, श्रीलंका विरुद्ध शानदार शतक

विराट कोहली याने गेल्या 35 दिवसात तिसरं शतक ठोकलंय. तर श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील विराटचं हे दुसरं शतक ठरलंय.

Virat Kohli : विराट कोहली याचा धडाका सुरुच, श्रीलंका विरुद्ध शानदार शतक
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 5:42 PM

तिरुवअनंतपूरम : टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली आपल्या जुन्या रंगात परतला आहे. विराटने पुन्हा एकदा श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शतक ठोकलंय. विराटने तिसऱ्या सामन्यात 85 बॉलमध्ये शतक पूर्ण केलंय. या शतकात विराटने 10 चौकार आणि 1 सिक्स ठोकला. विराटने या दरम्यान 117.65 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. विराटच्या एकदिवसीय कारकीर्दीतील 46 वं तर एकूण 76 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं.

विराटचं श्रीलंका विरुद्धही आणि या नववर्षातीलही एकूण दुसरं शतक ठरलं. तर गेल्या 35 दिवसातील तिसरं एकदिवसीय शतक ठरलंय. याआधी विराटने 10 जानेवारीला श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 113 धावांची खेळी केली होती. तर बांगलादेश दौऱ्यावर असताना वनडे सीरिजमध्ये 10 डिसेंबरला खणखणीत शतक केलं होतं. विशेष बाब म्हणजे विराटने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या सामन्यात आणि बांगलादेश विरुद्ध 113 रन्स केल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

दरम्यान विराट नाबाद डगआऊटमध्ये परतला. विराटने 110 बॉलमध्ये 13 चौकारांसह 8 खणखणीत षटकारांसह नॉटआऊट 166 धावा केल्या. विराटला गेल्या अनेक वर्षांपासून सूर गवसत नव्हता. त्याला चांगली सुरुवात मिळत होती, मात्र त्याचं रुपांतर शतकात होत नव्हतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून विराट त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करतोय. यावर्षी एकदिवसीय वर्ल्ड कपचं आयोजन हे भारतात करण्यात आलंय. त्यानुसार टीम मॅनेजमेंटने आखणीही केली आहे. त्यात विराट आता जुन्या रंगात परतलाय.

विराटचा शतकी तडाखा

शुबमनचंही शतक

विराट कोहलीआधी टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिलनेही शतक ठोकलं. शुबमनने 89 बॉलमध्ये 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. शुबमनचा या दरम्यान स्ट्राइक रेट 112.36 इतका होता. शुबमन शतक ठोकल्यानंतर आणखी निर्धास्तपणे खेळू लागला. शुबमनला मोठी खेळी साकारण्याची संधी होती. मात्र शुबमन 116 धावांवर बोल्ड झाला.

श्रीलंकेला 391 धावांच आव्हान

शुबमन आणि विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 391 धावांच आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 390 धावा केल्या. शुबमन आणि विराट व्यतिरिक्त टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांनी 42 आणि 38 धावांचं योगदान दिलं.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि वॉशिंगटन सुंदर.

श्रीलंका प्लेइंग XI : दसुन शनाका (कॅप्टन), अविष्का फर्नांडो, एन. फर्नांडो, कुसल मेंडिस, आसेन बनडारा, चरिथ असालंका, , वानिंदु हसारंगा, जेफरे वॅनडरसे, कसुन रजित, चामिका करूणारत्ने आणि लाहिरू कुमारा.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.