IND vs SL : भारत श्रीलंका तिसऱ्या टी20 सामन्याच्या नाणेफेकीस उशीर, कारण की…

भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरा टी20 सामना होत आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना नाणेफेकीला उशीर झाला आहे. क्रीडाप्रेमींना याबाबत कारण माहिती नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. तुम्हीही सामना सुरु होण्याची वाट पाहात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

IND vs SL : भारत श्रीलंका तिसऱ्या टी20 सामन्याच्या नाणेफेकीस उशीर, कारण की...
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 7:22 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरा टी20 सामना होत आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने आधीच 2-0 ने जिंकली आहे. त्यामुळे तिसरा सामना औपचारिक असला तरी भारत श्रीलंकेला क्लिन स्विप देण्यासाठी उतरेल. असं असताना तिसरा सामना सुरु होण्यास उशीर झाला आहे. कारण पाऊस पडल्यानंतर मैदान बऱ्यापैकी ओलं आहे. त्यामुळे सामना 7 वाजता सुरु करणं कठीण झालं. त्यामुळे मैदानाची पाहणी केल्यानंतर नाणेफेक 7.40 होणार हे जाहीर करण्यात आलं आहे. हा सामना रात्री 8 वाजता सुरु होईल. या सामन्यात प्लेइंग इलेव्हन काय असेल याचीही उत्सुकता लागून आहे. संजू सॅमसनला दुसऱ्या टी20 सामन्यात संधी मिळाली होती. मात्र शून्यावर बाद झाल्याने त्याच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. शुबमन गिल फिट अँड फाईन झाला तर संजू सॅमसनचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मालिका आधीच खिशात टाकल्याने संजूसह बेंचवर बसलेल्या तीन खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

संजू सॅमसनला संधी मिळाली तर सिद्ध करण्यासाठी शेवटची संधी असू शकते. कारण यानंतर बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिका आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात तीन सामन्यांची टी20 मालिका असणार आहे. त्यामुळे या बांगलादेश मालिकेसाठी निवड करणं होऊन जाईल असं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.

दुसरीकडे, तिसऱ्या सामन्यातील पिचबाबत सांगायचं तर नवीन खेळपट्टी आहे. ज्या खेळपट्टीवर दोन सामने झाले अगदी त्याच्या बाजूला ही खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर क्रॅक आहेत. त्यामुळे फिरकीपटूंना मदत मिळू शकते. स्लोवर बॉल इफेक्टिव्ह ठरू शकतो. दव असेल त्यामुळे बॉल थोडासा ओला होऊल. त्यामुळे धावांचा पाठलाग करणं फायदेशीर ठरेलं. या खेळपट्टीवर 160-170 धावसंख्या खूप होईल.

दोन्ही संघांचे खेळाडू

टी 20 सीरिजसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो

टी20 मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.