Mohammed Siraj याचा दिलदारपणा, आशिया कप जिंकल्यानंतर मोठा निर्णय
Mohammed Siraj Asia Cup 2023 Final | मोहम्मद सिराज याने आशिया कप 2023 फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. त्याने 6 विकेट्स घेतल्याने टीम इंडियाच्या विजयाची वाट मोकळी झाली.
कोलंबो | मोहम्मद सिराज याच्या 6 विकेट्सनंतर शुबमन गिल-ईशान किशन या दोघांनी केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 50 ओव्हर्समध्ये 51 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 6.1 ओव्हरमध्ये म्हणजेच 37 बॉलमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. शुबमन गिल याने 27 आणि ईशान किशन याने 23 धावांची नाबाद खेळी केली. टीम इंडियाचा हा वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. सिराजने 7 ओव्हरच्या स्पेलमध्ये 21 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. सिराजने झटपट श्रीलंकेच्या गोलंदाजांना गुंडाळल्याने टीम इंडियाला आशिया कप फायनलमध्ये सहज विजय मिळवता आला. सिराजने केलेल्या या कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. यानंतर सिराजने एक मोठा निर्णय घेतला. यामुळे सिराजचं सोशल मीडियावर तोंडभरुन कौतुक केलं जात आहे.
नक्की काय झालं?
ट्रॉफी आणि ठराविक रक्कम असं या मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचं स्वरुप. सिराजला रक्कमेचा धनादेश आणि ट्रॉफी देण्यात आली.त्यानंतर सिराजने रवी शास्त्री यांच्याशी बोलताना आपल्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया दिली. या दरम्यान सिराजने आपल्या बक्षिसाची संपूर्ण रक्कम ही कोलंबो आर प्रेमदासा स्टेडियममधील ग्राउंड स्टाफला देत असल्याची घोषणा केली.
सिराजने ही घोषणा करताच त्याच्या या निर्णयाचं उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. या संपूर्ण स्पर्धेत ग्राउंड स्टाफने निर्णायक भूमिका बजावली. ही स्पर्धा पावसाच्या सावटाखाली पार पडली. साखळी फेरीतील टीम इंडिया-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला. अनेक सामन्यांमध्ये पावसानं विघ्न घातलं. मात्र सर्व विघ्नांना ग्राउंड स्टाफ पूरुन उरला. त्यांच्या या कामगिरीचं चहुबाजूने कौतुक करण्यात आलं.
जिंकलंस भावा जिंकलंस
#INDvSL : Mohammed Siraj gives away the prize money of the man of the match award to the Sri Lankan geound staff.
Gem on the field. Gem off the field.
Miyan Bhai winning hearts ♥️#AsianCup2023 pic.twitter.com/HLR3PWbpvh
— Roshan Rai (@RoshanKrRaii) September 17, 2023
मोहम्मद सिराज यानेही ग्राउंड स्टाफचं फक्त कौतुकच केलं नाही, तर त्यांच्यासाठी आपल्या बक्षिसावर पाणी सोडलं आणि मनाचा मोठेपणा दाखवला. सिराजच्या या निर्णयाचं भरभरुन कौतुक केलं जात आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली. केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
आशिया कप फायनलसाठी श्रीलंकेचे 11 शिलेदार | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन आणि मथीशा पाथिराना.