IND vs SL | टीम इंडियाचा 41 धावांनी शानदार विजय, श्रीलंकेचा विजयरथ रोखला, फायनलमध्ये धडक
Asia Cup 2023 INDIA vs SRI LANKA | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेवर शानदार विजय मिळवत जबरदस्त कामगिरी केली आहे. टीम इंडियाने यासह आशिया कपच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.
कोलंबो | टीम इंडियाने आशिया कप 2023 सुपर 4 मधील सामन्यात श्रीलंकेवर 41 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 213 धावांचा शानदार बचाव करत श्रीलंकेचा विजयरथ रोखला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी लंकेचा 41.3 ओव्हरमध्येच 172 धावांवर बाजार उठवला. यासह टीम इंडियाची ही आशिया कपच्या फायनलमध्ये पोहचण्याची दहावी वेळ ठरली आहे. तसेच टीम इंडियाने श्रीलंकेचा विजयीरथ यशस्वीपणे रोखला. याआधी लंकेने सलग 13 वनडे सामने जिंकले होते.
श्रीलंकेची बॅटिंग
श्रीलंकेकडून दुनिथ वेललागे याने नाबाद सर्वाधिक 42 धावा केल्या. धनंजया डी सील्वा याने 41 धावांचं योगदान दिल. चरिथा असलंका याने 22, सदीरा समाराविक्रमा 17 आणि कुसल मेंडीस याने 15 धावा केल्या. मथीशा पथीराना आला तसाच झिरोवर गेला. तर उर्वरित 5 जणांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेत कुलदीपला चांगली साथ दिली. तर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
टीम इंडियाची फायनलमध्ये धडक
India overcome Dunith Wellalage’s fighting all-round show to notch up second win in the Super 4 stage of #AsiaCup2023 👌#INDvSL 📝: https://t.co/BBkqm36Lj3 pic.twitter.com/UzWLGenICC
— ICC (@ICC) September 12, 2023
टीम इंडियाची बॅटिंग
त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकला. टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं. टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्मा याने सर्वाधिक 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर दहाव्या विकेटसाठी अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज या दोघांनी केलेल्या 27 धावांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाला 49.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 213 धावा करता आल्या.
टीम इंडियाकडून शुबमन गिल 19 , विराट कोहली 3, ईशान किशन 33, केएल राहुल 39, हार्दिक पंड्या 5 आणि रविंद्र जडेजा याने 4 धावा केल्या. जसप्रीत बुमहारने 5 रन्स केल्या. तर कुलदीप यादव भोपळा न फोडताच माघारी परतला. अखेरच्या क्षणी 10 विकेटसाठी मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल या दोघांनी निर्णायक 27 धावा जोडल्या. त्यानंतर अक्षर 26 धावांवर आऊट झाला. तर सिराज 5 धावांवर नाबाद परतला.
श्रीलंकेकडून दुनिथ वेललागे याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर चरिथा असलंका याने 4 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर महीश थेक्षाना याने 1 विकेट घेतली.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.