IND vs SL: वेंकटेश अय्यरची पॉईंटला जबरदस्त कॅच, पण चेंडू लागला कुठे? हा VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू

| Updated on: Feb 28, 2022 | 12:11 AM

IND vs SL: भारताने श्रीलंकेविरुद्धचा (India vs Srilanka) तिसरा टी-20 सामना आज सहा विकेटने जिंकला. भारताने ही मालिका 3-0 अशी खिशात घातली

IND vs SL: वेंकटेश अय्यरची पॉईंटला जबरदस्त कॅच, पण चेंडू लागला कुठे? हा VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू
Follow us on

धर्मशाळा: भारताने श्रीलंकेविरुद्धचा (India vs Srilanka) तिसरा टी-20 सामना आज सहा विकेटने जिंकला. भारताने ही मालिका 3-0 अशी खिशात घातली. टीम इंडियाने ‘क्लीन स्वीप’ची हॅट्रिक केली आहे. आधी न्यूझीलंड, त्यानंतर वेस्ट इंडिज आणि आता श्रीलंका. श्रीलंकेविरुद्धच्या या मालिका विजयात भारताचा हिरो ठरला, तो श्रेयस अय्यर. (Shreyas iyer) त्याने जबरदस्त फलंदाजी केली. भारताने आजचा सामना अत्यंत सहजतेने जिंकला. पण हा सामना सुरु असताना काही गमतीशीर प्रसंगही घडले. आजच्या सामन्यात वेंकटेश अय्यरने (Venktesh iyer) बॅकवर्ड पॉईंटला दीनेश चंडीमलचा सुरेख झेल टिपला.

हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर चंडीमलने पॉईटने दिशेने जोरदार फटका मारला. पण वेंकटेशने एक अप्रतिम कॅच पकडली. ही कॅच पाहून अनेकांना हसूही आलं. कॅच पकडल्यानंतर वेंकटेश कळवळला. पण त्याला चेंडू नेमका लागला कुठे? हेच सुरुवातीला समजलं नाही. रोहित शर्मासह संघातील सहकाऱ्यांनाही हसू आवरलं नाही. सामन्याच्या 13 व्या षटकात हा प्रकार घडला. हर्षल पटेलने आज चार षटकात 29 धावा दिल्या तर वेंकटेश आज फक्त पाच धावांवर आऊट झाला.

श्रीलंकेने विजयासाठी दिलेले 147 धावांचे टार्गेट आरामात पार केले. या सामन्यातही श्रेयस अय्यर हिरो ठरला. त्याच्या 45 चेंडूतील नाबाद 73 धावांच्या बळावर भारताने हा विजय संपादन केला. श्रेयसने आज अर्धशतकांची हॅट्रीक पूर्ण केली. या मालिकेत श्रेयसने एकट्याने 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी T 20 मध्ये आतापर्यंत कुठल्याही भारतीय क्रिकेटपटूला करता आलेली नाही. श्रेयस अय्यर आणि रवींद्र जाडेजाने भारताच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब केलं. मायदेशात झालेल्या मालिकेत भारताने क्लीन स्वीपची ही हॅट्रिक केली आहे.

हा VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू