IND vs SL, 3rd T20 : भारताकडून श्रीलंकेला क्लीन स्वीप, 3-0 ने जिंकली मालिका

| Updated on: Feb 27, 2022 | 10:53 PM

भारत आणि श्रीलंकेमध्ये (Ind vs SL) आज मालिकेतील तिसरा आणि शेवटचा T 20 सामना होत आहे. धर्मशाळाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर हा सामना होत आहे.

IND vs SL, 3rd T20 : भारताकडून श्रीलंकेला क्लीन स्वीप, 3-0 ने जिंकली मालिका
Image Credit source: bcci photo
Follow us on

सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने (Indian cricket team) श्रीलंके विरुद्धचा तिसरा टी 20 सामना सहा विकेटने जिंकला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेले 147 धावांचे टार्गेट आरामात पार केले. या सामन्यातही श्रेयस अय्यर (Shreyas iyer) हिरो ठरला. त्याच्या 45 चेंडूतील नाबाद 73 धावांच्या बळावर भारताने हा विजय संपादन केला. श्रेयसने आज अर्धशतकांची हॅट्रीक पूर्ण केली. या मालिकेत श्रेयसने एकट्याने 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी T 20 मध्ये आतापर्यंत कुठल्याही भारतीय क्रिकेटपटूला करता आलेली नाही. श्रेयस अय्यर आणि रवींद्र जाडेजाने (Ravindra jadeja) भारताच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब केलं. मायदेशात झालेल्या मालिकेत भारताने क्लीन स्वीपची ही हॅट्रिक केली आहे.

Key Events

सामन्याआधी भारताला झटका

तिसऱ्या टी 20 सामन्याआधी भारताला झटका बसला आहे. सलामीवीर इशान किशन आजच्या सामन्यात खेळत नाहीय. बीसीसीआयने काहीवेळ आधी ही माहिती दिली.

भारताला विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य

श्रीलंकेने कॅप्टन दासुन शनाकाच्या 38 चेंडूतील नाबाद 74 धावांच्या खेळीच्या बळावर निर्धारीत 20 षटकात पाच बाद 146 धावा केल्या आहेत.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 27 Feb 2022 10:21 PM (IST)

    भारताकडून श्रीलंकेला क्लीन स्वीप, 3-0 ने जिंकली मालिका

    वेस्ट इंडिज पाठोपाठ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही भारताने क्लीन स्वीप केलं. भारताने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा T 20 सामना सहा विकेटने जिंकला. अशा प्रकारे भारताने मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश संपादन केलं. रवींद्र जाडेजा (22) आणि श्रेयस अय्यरने (73) भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं

  • 27 Feb 2022 10:11 PM (IST)

    भारताच्या 15 षटकात 123 धावा

    भारताच्या 15 षटकात 123 धावा झाल्या आहेत. श्रेयस 61 आणि जाडेजा 10 धावांवर खेळतोय.


  • 27 Feb 2022 10:07 PM (IST)

    भारताच्या चार बाद 116 धावा

    14 षटकात भारताच्या चार बाद 116 धावा झाल्या आहेत. भारताला विजयासाठी 36 चेंडूत 31 धावांची आवश्यकता आहे. श्रेयस अय्यर 57 आणि रवींद्र जाडेजा 7 धावांवर खेळतोय. भारताला विजयासाठी

  • 27 Feb 2022 09:56 PM (IST)

    भारताला चौथा धक्का

    भारताला चौथा धक्का बसला आहे. वेंकटेश अय्यर पाच धावांवर आऊट झाला. कुमाराच्या गोलंदाजीवर वेंकटेश झेलबाद झाला. भारताच्या चार बाद 104 धावा झाल्या आहेत.

  • 27 Feb 2022 09:50 PM (IST)

    श्रेयस अय्यरची हाफ सेंच्युरीची हॅट्रीक

    श्रेयस अय्यरने शानदार षटकार खेचून या मालिकेतील अर्धशतकाची हॅट्रीक पूर्ण केली. श्रेयस आता 50 धावांवर खेळतोय. श्रेयसचं हे सलग तिसरं अर्धशतक आहे.

  • 27 Feb 2022 09:47 PM (IST)

    कुमाराच्या शानदार यॉर्करवर दीपक हुड्डा क्लीन बोल्ड

    लाहीरु कुमाराच्या एका शानदार यॉर्करवर दीपक हुड्डा 21 धावांवर क्लीन बोल्ड झाला. 11 षटकात भारताच्या तीन बाद 93 धावा झाल्या आहेत.

  • 27 Feb 2022 09:41 PM (IST)

    दीपक हुड्डाचा कव्हरमध्ये जबरदस्त षटकार

    जैफरी वेंडरसेच्या षटकात दीपक हुड्डाने कव्हरमध्ये जबरदस्त षटकार लगावला. दहा षटकात भारताच्या दोन बाद 86 धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यर 42 आणि दीपक हुड्डा 20 धावांवर खेळतोय. श्रेयसने आतापर्यंत सात चौकार तर दीपकने एक चौकार आणि एक षटकार लगावला आहे.

  • 27 Feb 2022 09:36 PM (IST)

    दीपक हुड्डाचा शानदार चौकार

    नऊ षटकात भारताच्या दोन बाद 76 धावा झाल्या आहेत.

  • 27 Feb 2022 09:32 PM (IST)

    दीपक हुड्डाला आज मोठी संधी

    भारताच्या आठ षटकात दोन बाद 63 धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यर 34 आणि दीपक हुड्डा 5 धावांवर खेळतोय. संजू सॅमसनच्या रुपाने भारताला दुसरा झटका बसला आहे. करुणारत्नेने संजूला चंडीमलकरवी 18 धावांवर झेलबाद केले. संजू सॅमसनने त्याच्या खेळीत तीन चौकार लगावले.

  • 27 Feb 2022 09:18 PM (IST)

    रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने सावरला डाव

    पहिल्या पाच षटकात भारताच्या एक बाद 37 धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यरची दमदार फलंदाजी सुरु आहे. तो 22 धावांवर खेळतोय. त्याला संजू सॅमसन साथ देत आहे.

  • 27 Feb 2022 09:02 PM (IST)

    रोहित शर्मा पुन्हा फ्लॉप, भारताची पहिली विकेट

    रोहित शर्मा पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला आहे. रोहित शर्माला पाच धावांवर चामीराने करुणारत्नेकरवी रोहितला झेलबाद केले. भारताच्या एक बाद 7 धावा झाल्या आहेत.

  • 27 Feb 2022 08:57 PM (IST)

    भारताच्या डावाची सुरुवात

    भारताच्या डावाची सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि संजू सॅमसन ही सलामीची जोडी मैदानात आहे. पहिल्या षटकात भारताच्या बिनबाद 5 धावा झाल्या आहेत.

  • 27 Feb 2022 08:46 PM (IST)

    दासुन शनाकाची कॅप्टन इनिग्स

    कालप्रमाणे आजही दासुन शनाकाने कॅप्टन इनिग्स दाखवली. 38 चेंडूतील त्याच्या नाबाद 74 धावांच्या खेळीच्या बळावर श्रीलंकेने भारताला विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य दिले आहे. शनाकाने त्याच्या 74 धावांच्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार लगावले. सहाव्या विकेटसाठी त्याने चामिका करुणारत्नेसोबत मिळून नाबाद 84 धावांची भागीदारी केली.

  • 27 Feb 2022 08:36 PM (IST)

    श्रीलंका पाच बाद 134 धावा

    कर्णधार दासुन शनाकाच्या दमदार फलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने 19 षटकात पाचबाद 134 धावा झाल्या आहेत. 19 व्या षटकात 19 धावा निघाल्या.

  • 27 Feb 2022 08:20 PM (IST)

    श्रीलंकेच्या पाच बाद 90 धावा

    16 षटकात श्रीलंकेच्या पाच बाद 90 धावा झाल्या आहेत. दासुन शनाका 25 आणि चामिका करुणारत्नेची 7 जोडी मैदानावर आहे.

  • 27 Feb 2022 07:42 PM (IST)

    श्रीलंकेची हालत खराब, चौथी विकेट

    फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने श्रीलंकेला चौथा धक्का दिला. जानिथ लियांगेला 9 धावांवर बिश्नोईने क्लीन बोल्ड केलं. आठ षटकात श्रीलंकेच्या चार बाद 29 धावा झाल्या आहेत.

  • 27 Feb 2022 07:23 PM (IST)

    आवेश खानने मिळवून दिलं तिसरं यश

    आवेश खानने श्रीलंकेला तिसरा धक्का दिला आहे. चार षटकांअखेरीस श्रीलंकेच्या तीन बाद 11 धावा झाल्या आहेत. चारिथा असालंका अवघ्या चार रन्सवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. विकेटकीपर संजू सॅमसनने त्याचा झेल घेतला.

  • 27 Feb 2022 07:12 PM (IST)

    श्रीलंकेची दुसरी विकेट

    श्रीलंकेला दुसरा धक्का बसला आहे. सलामीवीर पाथुम निसंका अवघ्या एक रन्सवर बाद झाला. आवेश खानच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण वेंकटेश अय्यरने कुठलीही चूक न करता झेल घेतला. श्रीलंकेच्या दोन षटकात दोन बाद पाच धावा झाल्या आहेत. आवेश खानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला हा पहिला विकेट आहे.

  • 27 Feb 2022 07:06 PM (IST)

    पहिल्या षटकात श्रीलंकेला झटका

    मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात श्रीलंकेला झटका दिला आहे. सलामीवीर दानुष्का गुणाथिलका शुन्यावर बाद झाला. सिराजने त्याला क्लीन बोल्ड केलं. पहिल्या षटकात श्रीलंकेची धावसंख्या 1/1 अशी आहे.

  • 27 Feb 2022 06:58 PM (IST)

    भारताची नजर विश्वविक्रमावर

    भारताने टी 20 सीरीज आधीच जिंकली आहे. आता भारताची नजर वर्ल्ड रेकॉर्डवर आहे. भारताने आजचा सामना जिंकला, तर मायदेशात सर्वाधिक टी 20 सामने जिंकण्याचा विक्रम भारताच्या नावावर नोंदवला जाईल. सध्या भारत न्यूझीलंडलसह 39 सामने जिंकून संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहे.

  • 27 Feb 2022 06:48 PM (IST)

    श्रीलंकेची प्लेइंग-11

    दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसंका. दानुष्का गुणाथिलका, चारिथा असालंका, दिनेश चंडीमल (विकेटकीपर), जानिथ लियांगे, चामिका करुणारत्ने, दुशमंथा चामिरा, जैफरी वेंडरसे, बिनुरा फर्नांडो, लाहिरू कुमारा.

  • 27 Feb 2022 06:47 PM (IST)

    टीम इंडियाची प्लेइंग-11

    रोहित शर्मा (कर्णधार), वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान,रवि बिश्नोई.

  • 27 Feb 2022 06:46 PM (IST)

    भारतीय संघात चार बदल

    भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि इशान किशन आजचा सामना खेळत नाहीयत. त्यांच्याजागी रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आवेश खानला संधी देण्यात आली आहे.