IND vs SL : मोहम्मद सिराज चरिथ असलंकाला भिडला, 16 चेंडू निर्धाव गेल्यानंतर जवळ जाऊन डिवचलं!

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरु आहे. हा सामना भारताच्या पारड्यात असल्याचं दिसून येत आहे. श्रीलंकेचे चार गडी झटपट बाद झाल्याने दबाव वाढला आहे. मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं.

IND vs SL : मोहम्मद सिराज चरिथ असलंकाला भिडला, 16 चेंडू निर्धाव गेल्यानंतर जवळ जाऊन डिवचलं!
IND vs SL : मोहम्मद सिराजला श्रीलंकेविरुद्ध सूर गवसला, तीन गडी बाद केल्यानंतर चरिथ असलंकाची काढली खोडImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 7:53 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरु आहे. साखळी फेरीत आतापर्यंत भारताने एकही सामना गमावलेला नाही. आता श्रीलंकेविरुद्धचा सामनाही भारत सहज जिंकेल अशीच स्थिती आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजचा कहर पाहायला मिळाला. तीन गडी झटपट बाद करत श्रीलंकेला बॅकफूटला ढकललं. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमवून 357 धावा केल्या. श्रीलंकेसमोर विजयासाठी 358 धावांचं आव्हान ठेवलं. पण श्रीलंकेचा डाव पत्त्यासारखा कोसळला. श्रीलंकेला पहिल्याच चेंडूवर बुमराहने धक्का दिला. त्यानंतर सिराजने तर श्रीलंकन फलंदाजांची पिसं काढली. मोहम्मद सिराज दरम्यान चरिथ असलंकाला जवळ जाऊन डिवचलं.

मोहम्मद सिराजची भेदक गोलंदाजी खेळताना चरिथ असलंकाला त्रासदायक होतं. एक धाव घेणं देखील कठीण झालं होतं. त्यामुळे श्रीलंकेचा आणखी विकेट घेण्यासाठी मोहम्मद सिराजने सर्व काही पणाला लावल्याचं दिसलं. इतकंच काय चरिथ असलंकाने निर्धाव चेंडू सोडला की त्याच्या जवळ जाऊन डिवचत होता. जेणेकरून स्विंग बॉल खेळावा आणि बाद व्हावा. पण मोहम्मद सिराजला त्याची विकेट यश आलं नाही.

रोहित शर्माने दहावं षटक मोहम्मद शमीकडे सोपवलं. त्यानंतर मग काय शमीने पहिल्याच षटकात दोन गडी बाद केले. चरिथ असलंकाला बाद केलं. त्यानंतर आलेल्या दुशन हेमंथा याला शून्यावर तंबूत पाठवलं. त्यामुळे श्रीलंकेची स्थिती एकदमच वाईट झाली आहे. श्रीलंका मोठ्या फरकाने पराभूत झाल्यास स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.