Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : मोहम्मद सिराज याने विकेट घेता घेता केलं असं काही, विराट कोहली याला आलं हसू Watch Video

IND vs SL, Asia Cup 2023 : भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेचा संघ 50 धावांवरच ऑलआऊट झाला आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजने कहर केला. पण एक क्षण असा आला की तुम्हालाही हसू येईल.

IND vs SL : मोहम्मद सिराज याने विकेट घेता घेता केलं असं काही, विराट कोहली याला आलं हसू Watch Video
Video : मोहम्मद सिराज याने उडवली श्रीलंकेची दाणादाण, विकेट घेता घेता केलं असं की तुम्हीही हसाल
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 5:35 PM

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेत अंतिम फेरीचा संपूर्ण सामना भारताच्या पारड्यात झुकला. पहिल्या डावात मोहम्मद सिराजने घातक गोलंदाजी केली. श्रीलंकेच्या सहा खेळाडूंना तंबूत पाठवलं. या सामन्यात हॅटट्रीक चुकली मात्र श्रीलंकेला बॅकफूटला पाठवण्याची मोठी कामगिरी केली. चौथ्या षटकात श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत बसला होता. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर निसंकाला बाद केलं. दुसऱ्या चेंडूवर एकही धाव आली नाही. तिसऱ्या चेंडूवर समाराविक्रमाला शून्यावर पायचीत केलं. चौथ्या चेंडूवर असलंकाला झेलबाद केलं. पाचवा चेंडू हा हॅटट्रीक चेंडू होता. त्या चेंडूवर सिराजने विकेट घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र धनंजय डिसिल्वाने तसं होऊ दिलं नाही. उलट पाचव्या चेंडूवर मिड ऑनच्या दिशेन चेंडू तटकावला. मग काय मोहम्मद सिराज थांबतो का? जसा चेंडू मारला तशी त्याने सीमारेषेकडे धाव घेतली. ही कृती पाहून विराट कोहलीसह मैदानातील प्रेक्षकांनाही हसू आलं.

नेमकं काया झालं पाहा व्हिडीओ?

कर्णधार रोहित शर्मा याने मोहम्मद सिराज याच्या गोलंदाजीची धार पाहून मिडऑन आणि मिडविकेटवरील क्षेत्ररक्षक हटवले. त्यांना स्लिपला उभं केलं. हॅटट्रीक चेंडू मोहम्मद सिराजने ऑफ स्टम्प लाईनमधये टाकला आणि धनंजय डिसिल्वाने मिडऑनच्या दिशेन मारला. तिथे कोणीच उभं नव्हतं. मग काय सिराजने चौकार अडवण्यासाठी स्वत:च धाव घेतली. पण चौकार काही अडवू शकला नाही.

मोहम्मद सिराजची ही कृती पाहून स्लिपला उभा असलेल्या विराट कोहलीला हसू आवरलं नाही. तो मैदानात जोर जोरात हसू लागला. कारण एकतर इतक्या लांबून रनअप घेऊन चेंडू टाकला आणि चेंडू मारताच सीमारेषेकडे धाव घेतली. चौकार गेला तरी सहाव्या चेंडूवर धनंजय डिसिल्वाला तंबूत पाठवलं.

मोहम्मद सिराज याने 7 षटकात 21 धावा देऊन 6 गडी बाद केले. तर एक षटक निर्धाव टाकलं. मोहम्मद सिराज याने वनडे कारकिर्दित 50 विकेट बाद करण्याचा टप्पाही गाठला आहे. भारतासमोर अवघ्या 50 धावांच आव्हान आहे. त्यामुळे भारताचा विजय जवळपास निश्चित आहे. आशिया कप जिंकताच भारताच्या नावावर 8 जेतेपद होणार आहेत. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात हा दुसरा विजय असणार आहे.

कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा.