IND vs SL : मोहम्मद सिराजचा अवघड प्रयत्न आणि पथुम निसंकाची अर्धशतकी खेळी, काय झालं वाचा
भारताविरुद्ध सुरु असलेल्या वनडे सामन्यात श्रीलंकेची सुरुवात खूपच धीमी झाली. या सामन्यात फलंदाज झटपट बाद होत असताना पथुम निसंकाने एक बाजू धरून ठेवली. त्यामुळे श्रीलंकेला काही अंशी धीर मिळाला. तसेच त्याने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.असं असताना मोहम्मद सिराजच्या चुकीचा पथुम निसंकाने फायदा उचलला.
भारताविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला. तसेच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण श्रीलंकेची सुरुवात हवी तशी झाली नाही. संघाच्या 7 धावा असताना अविष्का फर्नांडो बाद झाला. त्यामुळे श्रीलंकन संघ बॅकफूटवर आला होता. पण पथुम निसंकाने एक बाजू सावरून धरली होती. पण इतर फलंदाज खेळपट्टी काही काळ तग धरून तंबूत परतत होते. कुसल मेंडिस, सदीरा समराविक्रमा, चरिथ असलंका स्वस्तात बाद झाले. पण पथुमने अर्धशतकी खेी करत संघाची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला. त्याने 75 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. पण पथुमचं हे अर्धशतक पूर्ण झालंच नसतं. निसंका अवघ्या 25 धावांवर असताना मोहम्मद सिराजने त्याचा झेल सोडला. त्याचा फायदा घेत पथुमने सावध खेळी करण्यास सुरुवात केली. तसेच भारताविरुद्ध अर्धशतक पूर्ण केलं.
रोहित शर्माने संघाचं आठवं षटक अर्शदीप सिंगकडे सोपवलं होतं. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पथुम निसंकाने फ्लिक केला. चेंडू लाँग ऑनच्या दिशेने वर चढला. हा झेल पकडण्यासाठी मोहम्मद सिराजने चांगला प्रयत्न केला. चेंडूखाली पोहोचलाही पण झेल पकडण्यात अयशस्वी ठरला. तसं पाहायला गेलं तर हा झेल अवघड होता. पण तसे झेल पकडणं आता क्रिकेटमध्ये नित्यातचं झालं आहे, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर पथुम निसंका पायचीत होत तंबूत परतला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.