Rohit Sharma : रोहित शर्मा टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Rohit Sharma On T20I Retirment : टी 20 मालिकेत पराभूत केल्यानंतर आता टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) एकदिवसीय मालिकेत भिडणार आहे. या 3 सामन्यांच्या एकदिवसीय (1ST ODI) मालिकेला 10 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या एकदिवसीय मालिकेच्या पूर्वसंध्येला कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. (ind vs sl odi series i have not given up on t20 cricket says team india captain rohit sharma on retriment)
रोहितने टी 20 कारकीर्दीबाबत प्रतिक्रिया दिली. टी 20 क्रिकेटला अलविदा करण्याबाबत वक्तव्य केलंय. रोहित आणि इतर अनुभवी खेळाडूंची श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेत निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे रोहित आणि विराटची टी 20 कारकीर्द संपल्याची चर्चा रंगली होती. तर टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडनेही याबाबत हिंट दिली होती. त्यामुळे निवृत्तीचा संशय आणखी वाढला. मात्र आता स्वत: रोहितनेच सर्व स्पष्ट केलंय.
रोहित काय म्हणाला?
“पहिली गोष्ट अशी की सातत्याने टी 20 सामने खेळणं शक्य नाही. तिन्ही फॉर्मेटमधील खेळाडूंना आवश्यक विश्रांती देणं गरजेचं आहे. माझीही हीच अवस्था आहे. न्यूझीलंड विरुद्ध आम्हाला 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळायची आहे. टी 20 निवृत्तीबाबत मी आयपीएलनंतर विचार करेन. मी टी 20 क्रिकेट सोडण्याचा विचार केलेला नाही”, असं रोहितने स्पष्ट केलं. श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या आधी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस रोहगित बोलत होता.
द्रविड काय म्हणाला होता?
“टी 20 वर्ल्ड 2022 सेमीफायनलनंतर असे 3-4 खेळाडूच आहेत, जे श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेत खेळत आहेत. पुढील टी 20 हंगामाबाबत आमचा विचार वेगळा आहे. टीम इंडियाच्या युवा खेळाडूंसाठी श्रीलंका विरुद्ध खेळण्याचा चांगला अनुभव राहिला. सध्या आमचं लक्ष्य हे आगामी वनडे वर्ल्ड कर आणि टेस्ट चॅम्पियनशीपवर आहे. त्यामुळे आमच्याकडे आता युवा खेळाडूंना संधी देऊन त्यांना पारखण्याची वेळ आहे”, असं द्रविडने स्पष्ट केलं.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.
टीम श्रीलंका : दसुन शनाका (कर्णधार), कुशल मेंडिस (उपकर्णधार), पथुम निशांका, अविश्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमे, चरिथ असालंका, धनंजय डि सिल्वा, आशेन बांद्रा, महीष तिक्षाणा, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसुन रजिथा, नुवांदु फर्नांडो, दुनिथ वेल्लागे, प्रमोद मुधशन आणि लाहिरु कुमारा.