IND vs SL ODI : पंत की केएल राहुल! अखेर निकाल लागला, रोहित शर्माने दिली या खेळाडूला पसंती
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला वनडे सामना आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर खेळत आहे. तसेच ऋषभ पंत की केएल राहुल हा देखील प्रश्न सुटला आहे.
भारत श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना होत असून नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला. श्रीलंकेने या मैदानाचा इतिहास आणि स्थिती जाणून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळपट्टी ड्राय असल्याचं सांगत चरीथ असलंकाने फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच शिराज या सामन्यातून पदार्पण करणार असल्याचं देखील जाहीर केलं. दुसरीकडे, टीम इंडिया सामन्यात कोणत्या खेळाडूंसह उतरणार याची उत्सुकता होती. कारण संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. अशात कोणत्या खेळाडूला संधी मिळणार याची उत्सुकता लागून होती. खासकरून ऋषभ पंत की केएल राहुल यापैकी कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चा सुरु होती. अखेर कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक होता प्लेइंग इलेव्हनवर मोहोर लावली. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर प्लेइंग इलेव्हनध्ये असतील. तसेच ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्यापैकी कोणाची निवड केली ते देखील जाहीर केलं.
कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ‘खेळपट्टी चांगली आहे. आम्ही या मैदानात खूप सारं क्रिकेट खेळलो आहोत आणि आम्हाला इथली परिस्थिती माहिती आहे. संघात बरेच बदल केले आहेत. मी पुन्हा आलो आहे. तर विराट, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि कुलदीप यादव संघात आहेत. शिवम दुबेही खेळत आहे. आमच्या संघात एक समतोलपणा आहे. आम्ही वर्ल्डकपमध्ये खूप चांगलं केलं होतं. फक्त आम्ही फिनिशिंग लाईन क्रॉस करू शकलो नाही. पण बरंच काही सकारात्मक घडलं आहे. आम्ही एक चांगलं वातावरण तयार केलं आहे. त्यामुळे खेळाडूंना मोकळेपणाने खेळता येईल.’ यासह रोहित शर्माला गोलंदाजी करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा रोहित म्हणाला की, नाही मी गोलंदाजी करणार नाही. मी फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करणार आहे. आमच्या संघात पुरेसे गोलंदाज आहेत. ते गोलंदाजी करू शकतात.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.