IND vs SL : दोनवेळा ऑल आऊट झाल्यावर रोहित शर्मा भडकला, पराभवाचं खापर ‘त्या’ एकावरच फोडलं, म्हणाला…

Rohit Sharma : श्रीलंकेविरूद्धचा दुसरा सामना गमावल्यानंतर रोहित शर्माने एका खेळाडूला दोषी ठरवलं आहे. श्रीलंकेने टीम इंडियाला सलग दोन सामन्यात ऑल आऊट केल्याने रोहित निराश झाला असून पराभवानंतर काय म्हणाला जाणून घ्या.

IND vs SL : दोनवेळा ऑल आऊट झाल्यावर रोहित शर्मा भडकला, पराभवाचं खापर 'त्या' एकावरच फोडलं,  म्हणाला...
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 11:38 PM

श्रीलंकेने दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा 32 धावांनी पराभव केला. श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना 240-8 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 208 धावांवर गुंडाळला गेला.  दोन्ही सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याचं दिसून आलं. रोहित शर्माने दोन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी करत चांगली सुरूवात करून दिली होती. मात्र त्यानंतर एकाही खेळाडूला मैदानावर तग धरता आला नाही. या पराभवानंतर रोहितने पराभवाचं खापर श्रीलंकेच्या खेळाडूवर फोडलं आहे.

रोहित शर्मा काय म्हणाला?

मॅच हरवल्यावर प्रत्येक गोष्टीचं दु:ख होतं. फक्त त्या 10 ओव्हरबद्दल नाही. कामगिरीमध्ये सातत्य ठेवता यायला हवे पण आज आम्ही ते करू शकलो नाही. थोडा निराश आहे पण हा खेळ असून या गोष्टी होत राहतात. जे सत्य आहे ते स्वीकारावं लागणार आहे. राईटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशनमुळे स्ट्राईक रोटेट करणं सोप्पे होईल असं आम्हाला वाटलं होतं, श्रीलंकेच्या विजयाचं पूर्णपणे श्रेय हे जेफ्रीला जाते, त्याने सहा विकेट घेतल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

मी ज्या पद्धतीने बॅटींग केली त्यामुळे मी 65 धावा करू शकलो. अशा पद्धतीने फलंदाजी करायची असते त्यावेळी खूप रिस्क घ्यावी लागते. पण विजयरेषा जर ओलांडली नाही तर खूप निराश वाटतं. पण मी माझ्या फलंदाजीमध्ये कोणत्याही बाबतीत तडजोड करणार नसल्याचं रोहित शर्माने सांगितलं.

सामन्याचा धावता आढावा

श्रीलंका संघाने आजच्या सामन्यात टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आजही दमदार प्रदर्शन करत श्रीलंकेच्या संघाला 240 धावांवर रोखलं. श्रीलंका संघाकडून अविष्का फर्नांडो आणि कामिंदू मेंडिस यांनी दोघांनीही 40 धावा केल्या होत्या. तर टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदर याने तीन विकेट घेतल्या. टीम इंडिया या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरल्यावर अवघ्या 208 धावांवर श्रीलंकेने त्यांचा गाशा गुंडाळला. जेनिथ लियानागे याने सहा विकेट घेत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.