रोहित शर्मा भारतीय क्रिकेटमधील तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं दमदार प्रदर्शन सुरु आहे. युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. अनेक नवीन रेकॉर्डस बनत आहे. आता आणखी एक नवीन रेकॉर्ड रोहितच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. तो सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा क्रिकेटपटू बनला आहे. (Photo: BCCI)
रोहित शर्माने रविवारी धर्मशाळा येथील स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सामन्यात हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. रोहितच्या करीयरमधील टी 20 चा हा 125 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. (Photo: PTI)
रोहितने या सामन्यात खेळून पाकिस्तानचा ऑलराऊंडर शोएब मलिकचा रेकॉर्ड मोडला. मलिकने आपल्या 16 वर्षाच्या करीयरमध्ये टी 20 चे 124 सामने खेळले आहेत. रोहित आणि शोएब मलिक नंतर या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा ऑलराऊंडर मोहम्मद हफीज आहे. तो 119 सामने खेळला आहे. (Photo: BCCI)
रोहितने 2007 च्या पहिल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध डेब्यू केला होता. त्यानंतर रोहित सातत्याने भारतीय संघाचा भाग राहिला आहे. टी 20 च्या प्रत्येक विश्वचषकात खेळणारा रोहित एकमेव खेळाडू आहे. (Photo: PTI)
100 पेक्षा जास्त टी 20 सामने खेळणारा तो एकमेव भारतीय आहे. टी 20 मध्ये सर्वात जास्त 3308 धावा त्याने केल्या आहेत. सर्वाधिक चार शतकही त्याच्या नावावर आहेत.