Video : शिवम दुबेला स्वत:च्याच गोलंदाजीवर LBW समजला नाही! केएल राहुलने अपील केली आणि…

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेने सावध सुरुवात केली आहे. वनडे वर्ल्डकपमधील स्थिती आणि टी20 क्रिकेटचा अनुभव पाहता खेळाडूंनी आखुडता हात घेतला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी चांगलाच घाम काढावा लागत आहे. शिवम दुबेला विकेट घेण्यात यश आलं, पण...

Video : शिवम दुबेला स्वत:च्याच गोलंदाजीवर LBW समजला नाही! केएल राहुलने अपील केली आणि...
Image Credit source: video grab
Follow us
| Updated on: Aug 02, 2024 | 4:01 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरु असून शिवम दुबेने पाच वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 2019 मध्ये पहिला वनडे सामना खेळला होता. त्यानंतर पाच वर्षांनी शिवम दुबे श्रीलंकेविरुद्ध वनडे सामना खेळत आहे. या सामन्यात शिबम दुबेने आपल्या गोलंदाजीची धार दाखवली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी निवडली पण सुरुवात काही चांगली झाली नाही. संघाच्या 7 धावा असताना अविष्का फर्नांडो सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर पथुम निसंका आणि कुसल मेंडिस यांनी सावध पवित्रा घेतला. त्यामुळे ही फोडण्यासाठी भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागला. श्रीलंकेच्या धावांचं वेग कमी असल्याने गोलंदाजही निश्चित होते. त्यामुळे विकेट मिळवण्यासाठी 10 षटकं थांबावी लागली. कर्णधार रोहित शर्माने संघाचं 14वं आणि वैयक्तिक तिसरं षटक शिवम दुबेकडे सोपवलं. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवण्यात शिवम दुबेला यश आलं. पण ही विकेट आहे की नाही याबाबत शिवम दुबे संभ्रमात होता. पण केएल राहुलची अपील कामी आली.

शिवम दुबे षटकाचा पहिला चेंडू टाकत असताना समोर कुसल मेंडिस होता. शिवम दुबेने त्याला अचूक टप्प्याचा चेंडू टाकला. मेंडिस एक पाय पुढे करून फटका मारण्याच्या प्रयत्ना होता. पण प्रयत्न फसला आणि चेंडू मागच्या पॅडच्या वरच्या भागाला आदळला. त्यामुळे हा चेंडू स्टंपवरून जाईल असा भास शिवम दुबेला झाला असता. पण विकेटकीपर केएल राहुल याने जोरदार अपीलं केलं. पण शिवम दुबे तसा काही इच्छुक नव्हता. पण केएल राहुलच्या अपीलसोबत अपील करून टाकली. मग काय पंच रवींद्र विमालासिरी यांनी बाद दिला. समाचोलकांनी ही बाब हेरली आणि अपीलचं मजेशीर वर्णन केलं.

श्रीलंकेने यासाठी रिव्ह्यू घेतला आणि तिसऱ्या पंचांनी अल्ट्रा एजमध्ये तपासणी केली. त्यात चेंडू मधल्या आणि ऑफ स्टंपवर आदळत असल्याचं दिसलं. पंचांनी मेंडीस बाद असल्याचं घोषित केलं आणि त्याला तंबूत परतावं लागलं. मेंडिस 31 चेंडूत 14 धावा करून बाद झाला.

पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.