IND vs SL : टीम इंडियाकडून 2022 चा शेवट गोड, आता 2023 ची विजयी सुरुवातीचं आव्हान

IND vs SL : श्रीलंका ही गत आशिया चॅम्पियन (Asia Cup Winner 2022) राहिली आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर श्रीलंकेचं मजबूत आव्हान असणार आहे.

IND vs SL : टीम इंडियाकडून 2022 चा शेवट गोड, आता 2023 ची विजयी सुरुवातीचं आव्हान
Indian Cricket TeamImage Credit source: बीसीसीआय
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 7:05 PM

मुंबई : टीम इंडियाला बांगलादेश (Team India Tour Of Bangladesh 2022) विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 च्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. मात्र यानंतर टीम इंडियाने कसोटी मालिकेत 2-0 ने विजय मिळवत पराभवाचा वचपा घेतला. इतकंच नाही, तर वर्षाचा शेवटही गोड केला. आता टीम इंडियाच्या नववर्षाची सुरुवात ही श्रीलंका विरुद्ध होणार आहे. श्रीलंका भारत दौऱ्यावर (Sri Lanka Tour Of India 2023) येणार आहे. श्रीलंका ही गत आशिया चॅम्पियन (Asia Cup Winner 2022) राहिली आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर श्रीलंकेचं मजबूत आव्हान असणार आहे. यामुळे टीम इंडिया नववर्षाची सुरुवात ही विजयाने करणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (ind vs sl sri lanka tour of india bcci will 27 december announced team india squad for t 20 and odi series)

उभयसंघात प्रत्येकी 3 सामन्यांची टी 20 आणि वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. या टी 20 मालिकेची आणि श्रीलंकेच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही मुंबईतून होणार आहे. पहिला सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. तर त्यानंतर उर्वरित 2 सामने हे 5 जानेवारीला पुणे आणि 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवण्यात येणार आहे.

एकदिवसीय मालिका

टी 20 मालिकेनंतर 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा वाहाटीत होणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना हा अनुक्रमे 12 आणि 15 जानेवारीला कोलकाता आणि तिरुवनंतपूरमला होणार आहे.

हे सुद्धा वाचा

मंगळवारी संघ जाहीर होणार

दरम्यान श्रीलंका विरुद्धच्या दोन्ही मालिकांसाठी टीम इंडियाचा आज म्हणजेत मंगळवार 27 डिसेंबरला संघ जाहीर करण्याता येणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुल ही ओपनिंग जोडी दिसणार नाही. रोहित अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला केएल आपल्या लग्नात बिजी असणार आहे.

दुसऱ्या बाजूला निवड समिती ऋषभ पंतला बाहेरचा रस्ता दाखवू शकते. ऋषभमध्ये प्रतिभा खूप आहे. मात्र सातत्याने फ्लॉप ठरल्याने त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळू शकते. अनेक बदल या संघात दिसू शकतात. त्यामुळे कुणाला संधी मिळणार अन् कोण कमनशिबी ठरणार, हे थोड्याच वेळेत स्पष्ट होईल.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.