IND vs SL : दीपक चाहरपाठोपाठ विस्फोटक फलंदाज संघाबाहेर, टीम इंडिया अडचणीत
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेआधी भारतीय संघाला झटका (Indian Cricket Team) बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka Cricket Team) टी 20 मालिकेत खेळू शकणार नाही, अशी बातमी मंगळवारी संध्याकाळी मिळाली होती.
लखनौ : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेआधी भारतीय संघाला झटका (Indian Cricket Team) बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka Cricket Team) टी 20 मालिकेत खेळू शकणार नाही, अशी बातमी मंगळवारी संध्याकाळी मिळाली होती. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत खेळताना दीपक चाहरला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे षटक सुरु असतानाच दीपकला मैदान सोडावं लागलं होतं. दीपक चाहर आगामी सीरीजमध्ये खेळू शकणार नाही. त्यातच आता आणखी एक वाईट बातमी आली आहे. विस्फोटक फलंदाज आणि नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिका विजयाचा हिरो सूर्यकुमार यादवदेखील (Suryakumar Yadav) श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेत सहभागी होणार नाही.
दीपक चाहरला फिटनेससाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये जावं लागणार आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. मार्चच्या अखेरीस IPL स्पर्धा सुरु होणार आहे. तो पर्यंत दीपक चाहर फिट होतो का? ते पहावे लागेल. संघाने दीपकच्या जागी दुसऱ्या कुठल्याही पर्यायाची मागणी केलेली नाही. कारण जसप्रीत बुमराह संघासोबत आहे.
सूर्यकुमार यादव अनफिट?
सूर्यकुमार सध्या संघासह लखनौमध्ये आहे. मंगळवारी संघाच्या सराव सत्राचाही तो भाग होता. मात्र, क्रिकबझच्या वृत्तानुसार या स्फोटक फलंदाजाला टी-20 मालिकेसाठी अनफिट घोषित करण्यात आले आहे. मात्र, त्याला ही दुखापत कधी आणि कशी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तीन सामन्यांमध्ये खेळला आणि त्यात त्याने 107 धावा केल्या. तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. अशा स्थितीत त्याची संघात अनुपस्थिती भारतासाठी कठीण होऊ शकते.
दीपक चाहर दुखापतग्रस्त
दीपक चाहरला रविवारच्या सामन्यात चांगला सूर गवसला होता. त्याने सुरुवातीला दोन विकेटही काढल्या होत्या. पण दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकताना दीपक लंगडताना दिसला. लगडतच त्याने मैदान सोडलं. भारताने वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना 17 धावांनी जिंकला असला, तरी त्याची दुखापत चिंतेचा विषय आहे. दीपक चाहरला झालेली हॅमस्ट्रिंगची दुखापत किती गंभीर आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. दीपक चाहर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये दीपक चाहरला CSK ने 14 कोटी रुपये खर्च करुन विकत घेतलं आहे.
ग्रेड वनच्या टीयरमधून पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी, बरं होण्यासाठी सहा आठवड्याचा कालावधी लागतो. त्यामुळे पुढचा साधारण दीड महिना दीपक उपलब्ध नसेल, असं म्हटलं जात आहे.
इतर बातम्या
KL Rahul donated 31 Lakh: 11 वर्षाच्या वरद नलावडेचे प्राण वाचवण्यासाठी केएल राहुलकडून 31 लाखाची मदत
Mumbai indians खेळाडूंसाठी डिझाइन करते स्पेशल प्रोग्रॅम, इशान किशनने सांगितलं यशाचं गुपित