संजू सॅमसनसाठी श्रीलंका दौरा ठरलं वाईट स्वप्न, दोन शून्यानंतर आता झालं असं…
श्रीलंकेविरुद्धची मालिका भारताने खिशात घातली. पण असं असलं तरी हा दौरा संजू सॅमसनच्या क्रिकेट कारकिर्दितला वाईट काळ ठरला. संजू सॅमसनला एकीकडे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळत नाही. मिळालं तर खेळत नाही असं काहीसं होत आहे. आता त्याच्या हातून विकेटच्या मागेही चूक घडली.
भारत आणि श्रीलंका तिसरा टी20 सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हमध्ये. भारताने 20 षटकात 9 गडी गमवून 137 धावा केल्या आणि विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना शेवटी धडाधड विकेट पडले. श्रीलंकेने 8 गडी गमवून 137 धावा केल्या. त्यामुळे सुपर ओव्हर टाकण्याची वेळ आली. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला फक्त 2 धावा करता आल्या. त्यातही एक धाव ही वाइडची मिळाली. त्यामुळे विजयासाठी मिळालेल्या तीन धावा भारताने सहज गाठल्या. सूर्यकुमारने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि विजय मिळवून दिला. भारताने मालिकेत श्रीलंकेला 3-0 क्लिन स्विप दिला आहे. भारताने मालिका जिंकली असली तरी हा दौरा संजू सॅमसनसाठी काही खास ठरला नाही. एकीकडे टी20 वर्ल्डकप स्पर्धा बेंचवर बसून बघण्याची वेळ आहे. दुसरीकडे, झिम्बाब्वे दौऱ्यात काही खास छाप पडली नाही. आता श्रीलंका दौऱ्यात सपशेल अपयशी ठरला. संधी मिळालेल्या दोन्ही सामन्यात त्याला आपलं खातं खोलता आलं नाही. इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. पण त्यात भर पडली ती झेल सोडल्याची..त्यामुळे संजू सॅमसनच्या चाहत्यांना धास्ती लागून राहिली आहे. संजूला नेमकं झालंय तरी काय? असा प्रश्न पडला आहे. फलंदाजी फेल आणि आता झेल सोडल्याने पुढच्या मालिकेत निवड होणं कठीण झालं आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादव याने सहावं षटक सिराजकडे सोपवलं होतं. या षटकात विकेटची अपेक्षा होती. त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावण्यात आलं होतं. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर संधी चालून आली. कुसल मेंडिस फटका मारताना चुकला आणि बॅटची एज लागली. चेंडू थेट संजू सॅमसनच्या हातात गेला. तसा झेल लांबला असला तरी विकेटकीपरने पकडण्यासारखा होता. कुसल मेंडिसचा झेल सोडला तेव्हा तो 12 धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने सावध खेळी करत पुन्हा संधी दिली नाही. 41 चेंडूत 43 धावा केल्या आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं . त्याला बाद करण्यात रवि बिष्णोईला यश आलं. पण विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचूनही संघाला यश मिळालं नाही आणि सुपर ओव्हरची वेळ आली.
A night to forget for Sanju Samson.
Hope he makes a strong comeback. pic.twitter.com/hH7YK1vlLy
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 30, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, खलील अहमद.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महेश थीक्षाना, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो.