IND vs SL T20: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी गंभीर-सूर्यकुमारचं टेन्शन वाढलं, झालं असं की…

श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेपासून कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा कार्यकाळ सुरु होणार आहे. त्यामुळे ही मालिका सर्वार्थाने खूप महत्त्वाची आहे. असं असताना सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरला या मालिकेपूर्वी धक्का बसला आहे. त्याचं कारणही तसंच आहेत. चला जाणून घेऊयात

IND vs SL T20: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी गंभीर-सूर्यकुमारचं टेन्शन वाढलं, झालं असं की...
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 8:50 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिका 27 जुलैपासून सुरु होणार आहे. पहिल्या सामन्यासाठी 24 तासांहून कमी कालावधी शिल्लक असताना टीम इंडियाला धक्का बसला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची डोकेदुखी वाढली आहे. कारण प्लेइंग इलेव्हन निवडताना सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांचा कस लागणार आहे. त्यात पहिल्याच सामन्यात विजयाचं दडपण असेल ते वेगळं.. मीडिया रिपोर्टनुसार, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सराव करताना दुखापतग्रस्त झाला आहे. सिराजच्या उजव्या पायाला दुखापत झली आहे. त्यामुळे त्याच्यावर उपचार केले जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या मालिकेतून मोहम्मद सिराज बाद होऊ शकतो. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या गैरहजेरीत मोहम्मद सिराजकडे गोलंदाजीची सूत्र असणार होती. कारण सध्या निवडलेल्या संघात तोच अनुभवी गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या दुखापतीमुळे टेन्शन वाढलं आहे.

सिराजची जागा कोण घेणार?

श्रीलंका दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव फक्त तीन वेगवान गोलंदाजांसह श्रीलंकेला आले आहेत. टी20 क्रिकेटमध्ये डेथ ओव्हरचं गणित काही वेगळंच असतं. अशावेळी अनुभवी गोलंदाजाची गरज असते. त्यात श्रीलंकेच्या मैदानावर डेथ ओव्हरमध्ये काही गडबड झाली तर थेट पराभवाच्या दरीत पडू . त्यामुळे मोहम्मद सिराजच्या जागी योग्य गोलंदाजाची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड करावी लागेल. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खलील अहमद आणि अर्शदीप सिंग असेल यात शंका नाही. तर सिराजच्या जागी आवेश खान किंवा मुकेश कुमार यापैकी एकाला संधी मिळू शकते. हे दोघेही झिम्बाब्वे दौऱ्यात टीम इंडियासोबत होते. जर सिराजची दुखापत गंभीर असेल तर यापैकी कोणाची निवड होईल याची उत्सुकता आहे.

भारतीय टी20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रायन पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.