संजू सॅमसनला मिळालेली शेवटची हुकली! तिसऱ्या टी20 सामन्यात नको तेच झालं…

भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर कर्णधार सूर्यकुमार यादवच्या मनाविरुद्ध निर्णय झाला. टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर याची प्रचिती आली.

संजू सॅमसनला मिळालेली शेवटची हुकली! तिसऱ्या टी20 सामन्यात नको तेच झालं...
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 8:36 PM

भारत श्रीलंका यांच्यात तिसरा टी20 सामना सुरु आहे. हा सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची संधी भारताकडे आहे. भारताने तीन सामन्यांची टी20 मालिका आधीच 2-0 ने जिंकली आहे. त्यामुळे तिसरा सामना औपचारिक असल्याने भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. या सामन्यात बेंचवर बसलेले खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनला दुसऱ्या सामन्यात संधी मिळूनही सोनं करू शकला नाही. त्याला संघात घेतलं नाही की गदारोळ आणि घेतलं की फेल असे काही द्विधा मनस्थितीत आता त्याचे चाहते आहेत. दुसऱ्या टी20 सामन्यात शुबमन गिलला दुखापत झाल्याने संधी मिळाली होती. पण तेव्हा गोल्डन डकवर बाद झाला होता. आता त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. खरं तर संजू सॅमसनसाठी ही शेवटची संधी होती अशी क्रीडाप्रेमींमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. कारण प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणं संजू सॅमसनला कठीण झालं आहे. त्यामुळे संघातील स्थान अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र संजू सॅमसन त्यातही फेल ठरला आहे. संजू सॅमसनला तिसऱ्या सामन्यात ओपनिंग करण्याची संधी मिळाली नाही. पण यशस्वी जयस्वाल बाद होताच त्याचं प्रमोशन झालं होतं.

तिसऱ्या स्थानावर आल्यानंतर बरीच षटकं शिल्लक होती आणि मोठी धावसंख्या करण्यासही संधी होती. पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. चार चेंडू खेळल्यानंतर त्याला भोपळा फोडता आला नाही. चमिंडू विक्रमासिंगच्या गोलंदाजीवर हसरंगाने त्याचा झेल पकडला. त्यामुळे सलग दुसऱ्यांचा शून्यावर बाद झाला आहे. संजू सॅमसनने या नकोशा खेळीसह नको त्या पंगतीत बसला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ही नकोशी कामगिरी केली आहे. तर रोहित शर्मा पाचवेळा शून्यावर बाद झाला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, खलील अहमद.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महेश थीक्षाना, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.