IND VS SL: ऋतुराज गायकवाडला किमान तीन चान्स दे, माजी क्रिकेटपटूची रोहित शर्माकडे मागणी

स्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर, आता टीम इंडिया टी-20 मालिकेत (India vs Sri Lanka, 1st T20I) श्रीलंकेशी भिडणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये होणार आहे. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माला एका माजी क्रिकेटपटूने विनंती केली आहे.

IND VS SL: ऋतुराज गायकवाडला किमान तीन चान्स दे, माजी क्रिकेटपटूची रोहित शर्माकडे मागणी
Rituraj Gaikwad Image Credit source: INSTAGRAM
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 3:29 PM

मुंबई : वेस्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर, आता टीम इंडिया टी-20 मालिकेत (India vs Sri Lanka, 1st T20I) श्रीलंकेशी भिडणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये होणार आहे. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माला एका माजी क्रिकेटपटूने विनंती केली आहे. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने आगामी तिन्ही सामन्यांमध्ये सलामीवीर ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संधी देण्याची विनंती कर्णधाराकडे केली. रोहित शर्माने ओपनिंगला जाऊ नये असेही आकाश चोप्राने सांगितले. यासोबतच संजू सॅमसनला तूर्तास संधी न देण्याबाबतही त्याने मत व्यक्त केले. आकाश चोप्राने (Aakash Chopra) त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, इशान किशनलादेखील संधी मिळायला हवी.

आकाश चोप्रा म्हणाला, ‘मला वाटतं ऋतुराज गायकवाड आणि इशान किशनला सलामीला संधी मिळायला हवी. आता लोक विचारतील संजू सॅमसन का नाही? माझा विश्वास आहे की जर तुम्ही इशान किशनला संधी देण्यास सुरुवात केली असेल तर तेच पुढे सुरु ठेवावे. कदाचित याचा अंत सुखद असेल. ऋतुराज आणि किशनला आणखी काही संधी मिळायला हव्यात. अवघ्या तीन सामन्यांनंतर तुम्ही खेळाडू बदलले तर त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल.

ऋतुराजने ओपनिंग करावी

आकाश चोप्राच्या मते ऋतुराज गायकवाडनेच ओपनिंग करायला हवी. आकाश म्हणाला, ‘मला ऋतुराज गायकवाडला सलामीला खेळताना पाहायला आवडेल कारण रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. ऋतुराजलाही तीन संधी मिळायला हव्यात. तसेच ऋतुराज आणि ईशान यांच्या उपस्थितीमुळे उजव्या आणि डाव्या हाताची सलामीची जोडी कायम राहणार आहे. ऋतुराजलाही संधी मिळायला हवी. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऋतुराजला संधी मिळाली होती, ज्यामध्ये तो चार धावा करून बाद झाला होता.

‘सॅमसनऐवजी दीपक हुड्डाला संधी मिळावी’

आकाश चोप्राच्या मते प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनपेक्षा दीपक हुड्डाला प्राधान्य मिळायला हवे. आकाश चोप्रा पुढे म्हणाला, ‘तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आणि पाचव्या क्रमांकावर दीपक हुडाला संधी मिळायला हवी. संजू सॅमसन टॉप ऑर्डरचा फलंदाज असताना तुम्ही त्याला पाचव्या क्रमांकावर खेळवू नये. जर तुम्ही त्यांना टॉप ऑर्डरमध्ये संधी देऊ शकत नसाल तर तुमच्या संधी वाया घालवण्यात काही अर्थ नाही. मला वेंकटेश अय्यर 6 व्या क्रमांकावर हवा आहे. पहिल्या T20 मध्ये जडेजा देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो. आता टीम इंडिया त्याचा कुठे वापर करते हे पाहावे लागेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहदेखील मैदानात उतरू शकतो.

इतर बातम्या

IND vs SL : ‘हिटमॅन’ शर्माकडे तीन विश्वविक्रमांची संधी, विराट, धवन, गप्टिलला मागे टाकणार?

ना रोहित, ना युवराज, IND vs SL T20 मधला सिक्सर किंग कोण? पाहा हिटिंग मास्टर्सची लिस्ट

IND vs SL : दीपक चाहरपाठोपाठ विस्फोटक फलंदाज संघाबाहेर, टीम इंडिया अडचणीत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.