IND vs SL : पराभवानंतरही राहूल द्रविडकडून टीम इंडियासाठी गुडन्यूज, ऑलराउंडरची लवकरच एन्ट्री

टीम इंडियाला श्रीलंका विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात पराभव स्वीकारा लागला. मात्र हेड कोच राहुल द्रविडने एका झटक्यात गुड न्यूज देत पराभव विसरण्यास भाग पाडलं.

IND vs SL : पराभवानंतरही राहूल द्रविडकडून टीम इंडियासाठी गुडन्यूज, ऑलराउंडरची लवकरच एन्ट्री
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 9:25 PM

मुंबई : टीम इंडियाला श्रीलंकाकडून दुसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL 2nd ODI) पराभव स्वीकारावा लागला. श्रीलंकेने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. या पराभवानंतरही टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविड फार टेन्शनमध्ये नाही. दुसऱ्या सामन्यानंतर द्रविडने दिलेल्या माहितीमुळे टीम इंडिया आणि मॅनेजमेंटला गुडन्यूज मिळाली आहे. (ind vs sl t20i series team india give hint about allrounder ravindra jadeja comeback after injurey)

द्रविडने दुखापीमुळे टीमबाहेर असलेल्या ऑलराउंडर रवींद्र जाडेजाबाबत अपडेट दिली आहे. द्रविडने जाडेजा दुखापतीनंतर कमबॅकसाठी सज्ज असल्याचे संकेत द्रविडने दिले आहेत. तसेच पराभवामुळे चिंतित न होता द्रविडने टीम इंडियाला जमेची बाजू सांगितली. सध्या टीम इंडिया स्पिन आणि ऑलराउंड आघाडीवर कमी पडतेय. मात्र जाडेजाच्या कमबॅकनंतर टीम इंडिया या दोन्ही आघांड्यावर चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही द्रविडने व्यक्त केला.

द्रविड काय म्हणाला?

“जाडेजा लवकर टीममध्ये असेल, ज्यामुळे स्पिन गोलंदाजीला आणखी धार मिळेल. मला वाटतं की स्पिन गोलंदाज ही टीम इंडियाची जमेची बाजू आहे. शाहबाज अहमद टीमचा भाग होता. वॉशिंग्टन सुंदर आहे, तसेच जाडेजा ही येईल. आम्ही टीमसोबत आनंदी आहोत”, असं द्रविड म्हणाला. तसेच अक्षर पटेलने दुसऱ्या टी 20 सामन्यात 2 विकेट्स घेतल्या. तसेच 31 बॉलमध्ये 65 धावांनी झंझावाती खेळी केली.

हे सुद्धा वाचा

“टी 20 क्रिकेटमध्ये जेव्हा केव्हा संधी मिळाल तेव्हा अक्षरने चांगली कामगिरी केली. हे चांगले संकेत आहेत. अक्षरसारखा खळाडू, सुंदर आणि जाडेजा आल्यानंतर पर्याय वाढतील”, असंही द्रविडने नमूद केलं.

दरम्यान टी 20 मालिकेतील तिसरा आणि सीरिज डिसायडर सामना शनिवारी 7 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवण्यात येणार आहे. मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे सामना जिंकून मालिका कोण जिंकणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.