ICC T20I Ranking : टीम इंडियाच्या त्रिमूर्तींचा टी 20 रॅंकिंगमध्ये धमाका, आयसीसीकडून मोठं गिफ्ट

आयसीसीने जाहीर केलेल्या टी 20 क्रमवारीत (Icc t20i Ranking) टीम इंडियाच्या खेळाडूंना मोठा फायदा झाला आहे.

ICC T20I Ranking : टीम इंडियाच्या त्रिमूर्तींचा टी 20 रॅंकिंगमध्ये धमाका, आयसीसीकडून मोठं गिफ्ट
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 4:50 PM

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी 20 मालिका (IND vs SL T20I Series) खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात पहिला सामना जिंकत विजयी सुरुवात केली. या सामन्यात निर्णायक क्षणी दीपक हुड्डाने फटकेबाजी केली. तर ईशान किशनने एक बाजू लावून धरली होती. तर हार्दिकनेही बॅटिंग-बॉलिंगने निर्णायक भूमिका बजावली. या दोघांना श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्याआधी मोठा फायदा झाला आहे. आयसीसीने या तिकडीला मोठं गिफ्ट दिलं आहे. (ind vs sl t20i series team india ishan kishan hardik pandya and deepak hooda given high jump in icc rankings)

आयसीसीने टी 20 रँकिंग जारी केली आहे. यामध्ये या तिघांना जबर फायदा झाला आहे. हार्दिक, ईशान आणि हुड्डा या तिघांना रँकिगमध्ये मजबूत फायदा झाला आहे. ईशानने फलंदाजांच्या यादीत 10 स्थानाने झेप घेतली आहे. यासह ईशान आता 23 व्या स्थानावर पोहचला आहे. दीपक हुड्डाने पहिल्या 100 मध्ये एन्ट्री घेतली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेवर पहिल्या टी 20 सामन्यात 2 धावांनी थरारक विजय मिळवला होता. या सामन्यात हुड्डा ह मॅन ऑफ द मॅच ठरला होता.

श्रीलंका विरुद्धच्या कामगिरीचा फायदा

हुड्डाने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात 23 बॉलमध्ये नाबाद 41 रन्स केल्या होत्या. हुड्डाला या खेळीचाच फायदा रँकिंगमध्ये झाला. आता हुड्डा 97 व्या स्थानी आहे. तसेच ईशाननेही पहिल्या सामन्यात 37 रन्स केल्या होत्या. ईशानलाही या खेळीमुळे रँकिंगमध्ये फायदा झाला. तर सूर्यकुमार यादव अव्वल स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे.

हे सुद्धा वाचा

हार्दिकची ‘लांब उडी’

हार्दिकने गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. हार्दिकने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 3 ओव्हर टाकल्या. हार्दिकने या 3 ओव्हरपैकी 13 बॉल डॉट टाकले. थोडक्यात सांगायचं झालं तर हार्दिकने 3 ओव्हर म्हणजेच एकूण 18 बॉल टाकले. त्यापैकी 13 बॉल डॉट टाकले. हार्दिकने भेदक बॉलिंग केली. त्यामुळे हार्दिकला 9 स्थानांचा फायदा झाला. त्यामुळे आता हार्दिक गोलंदाजांच्या क्रमवारीत 76 व्या क्रमांकावर आला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.