IND vs SL : मोर्केल नाहीतर टीम इंडियाच्या बॉलिंग कोचपदी मराठमोळ्या खेळाडूची निवड पण एका अटीवर

Team India Bowling Coach : टीम इंडिया उद्या म्हणजेच 22 जुलैला श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. मात्र टीम इंडियाच्या बॉलिंग कोचपदी कोण असणार याबाबत मोर्केलच्या नावाची चर्चा होती. पण अशातच टीम इंडियाच्या माजी खेळाडूच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

IND vs SL : मोर्केल नाहीतर टीम इंडियाच्या बॉलिंग कोचपदी मराठमोळ्या खेळाडूची निवड पण एका अटीवर
Follow us
| Updated on: Jul 21, 2024 | 7:00 PM

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी उद्या म्हणजेच 22 जुलैला रवाना होणार आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका टीममध्ये येत्या तीन टी-20 आणि तीन वनडे सामने होणार आहेत. टीम इंडियाचा नवीन कोच गौतम गंभीर याचा पहिला दौरा असणार आहे. या मालिकेसाठी बॉलिं कोच कोण असणार याबाबत अद्याप काही निर्णय झालेला समोर आलेला नाही. त्यामुळे बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटने श्रीलंका दौऱ्यावर एका मराठमोळ्या कोचची निवड केली आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठीच या कोचची निवड केलीये.

टीम इंडियाच्या बॉलिंग कोचसाठी साऊथ आफ्रिका टीमचा माजी वेगवान गोलंदाज मोर्ने मोर्केल याचं नाव चर्चेत होते. पण यावर अजुनही काही निर्णय झाला नसल्याने बीसीसीआयने तात्पुरती व्यवस्था केली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचे अंतरिम गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांची निवड केली आहे. साईराज हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. अभिषेक नायर आणि रायन टेन डोशेट यांना सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले असून ते श्रीलंकेला जाणार आहेत. मात्र, बीसीसीआयने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

गौतम गंभीर, साईराज बहुतुले, अभिषेक नायर, रायन टेन डोशेटे आणि टी दिलीप सोमवार, 22 जुलै रोजी खेळाडूंसह कोलंबोला रवाना होतील. टीम इंडियाचा श्रीलंका दौरा 27 जुलैपासून सुरू होत आहे. या दौऱ्याची सुरुवात T20 मालिकेने होणार आहे,  सूर्यकुमार यादवचीही कर्णधार म्हणून परीक्षा असणार आहे. सोमवारी गौतम गंभीर पत्रकार परिषद घेणार आहे. त्याच्यासोबत निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरही असणार आहेत. या पत्रकार परिषदवेळी कोटिंग आणि सपोर्ट स्टाफमध्ये कोण असणार हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

कोण आहेत साईराज बहुतुले?

साईराज बहुतुले यांनी दोन कसोटी सामने आणि आठ वनडे सामने खेळले आहेत. साईराज हे अष्टपैलू खेळाडू होते, मुंबईमधील क्रिकेट ग्राऊंडवर त्यांनी क्रिकेटचे धडे घेतले. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यासोबतही ते खेळलेत. आयपीएलमध्येही त्यांनी कोचपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

टी 20 सीरिज : पहिला सामना, 27 जुलै दुसरा सामना, 28 जुलै तिसरा सामना, 30 जुलै एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक : पहिला सामना, 2 ऑगस्ट, दुसरा सामना, 4 ऑगस्ट, तिसरा सामना, 7 ऑगस्ट

Non Stop LIVE Update
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.
अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन डोक्याला गंभीर दुखापत
अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन डोक्याला गंभीर दुखापत.
बारामतीचा दादा कोण? अजित पवार की युगेंद्र? लढाई पुतण्यावरून तापली
बारामतीचा दादा कोण? अजित पवार की युगेंद्र? लढाई पुतण्यावरून तापली.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?.
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'.
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....