IND vs WI : 1 जागा आणि 3 खेळाडू… राहुल द्रविड, शिखर धवनसमोर संघ निवडीचं आव्हान

शिखर धवन कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल आणि सलामीही करेल. त्याच्याशिवाय टीममध्ये आणखी तीन सलामीवीर आहेत - ईशान किशन , ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल. अशा स्थितीत विचारमंथन करावे लागणार आहे.

IND vs WI : 1 जागा आणि 3 खेळाडू... राहुल द्रविड, शिखर धवनसमोर संघ निवडीचं आव्हान
राहुल द्रविड, शिखर धवनImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 8:12 AM

मुंबई : एक जागा आणि 3 खेळाडू असं चित्र कर्णधारासमोर असेल तर. झाली ना गोची. इथे कुणाला टाळलं तर त्यावर अन्यायही व्हायला नको, अशी भावना असते. तर चांगल्या खेळाडूला संधी देण्याचंही तितकंच जबाबदारीचं काम असतं. भारतीय संघाला 22 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे (IND vs WI ODI). अशा परिस्थितीत प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना सलामीसाठी थोडी मेहनत करावी लागेल कारण रांगेत एक जागा आणि 3 खेळाडू आहेत. या मालिकेत शिखर धवन (Shikhar Dhawan) कर्णधारपदाची धुरा सांभाळेल आणि साहजिकच तो भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करेल. नियमित कर्णधार रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. शिखर धवन कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल आणि सलामीही करेल. त्याच्याशिवाय टीममध्ये आणखी तीन सलामीवीर आहेत – ईशान किशन , ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल . अशा स्थितीत दुसरा सलामीवीर निवडताना धवन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना काही विचारमंथन करावे लागेल.

ईशान किशन

  1. 24 वर्षीय इशान किशनला 3 एकदिवसीय सामन्यांचा अनुभव
  2. जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत त्याने खूप प्रभावित केले
  3. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या T20 मध्येही त्याला संधी मिळाली होती. पण तो 8 धावा करून बाद झाला.

ऋतुराज गायकवाड

  1. ऋतुराज गायकवाडनं अद्याप एकही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही
  2. हे सुद्धा वाचा
  3. आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणारा 25 वर्षीय ऋतुराज सध्या फॉर्ममध्ये नाही
  4. विशाखापट्टणममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात त्याने 57 धावा केल्या होत्या
  5. त्यानंतर राजकोटला टी-20मध्ये 5 धावा, बेंगळुरू टी-20मध्ये 10 धावा करता आल्या
  6. आयर्लंड विरुद्ध डब्लिन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 मध्ये भारताने 12 षटकात लक्ष्याचा पाठलाग करताना त्याला संधी दिली नाही.

शुभमन गिल

  1. शुभमन गिलकडेही आतापर्यंत केवळ 3 वनडे सामन्यांचा अनुभव आहे
  2. भारतीय संघाची रणनीती पाहिली तर त्याचे पारडे जड दिसते
  3. उजव्या हाताचा फलंदाज

भारतीय संघ डाव्या आणि उजव्या हातांचे संयोजन करतो. रोहित शर्मा उजव्या हाताने सलामीवीर आहे, तर डावखुरा शिखर धवन इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याच्यासोबत मैदानात उतरला आहे. आता उजव्या हाताचा सलामीवीर शुभमन धवनसोबत उतरू शकतो. 3 एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त पंजाबच्या या क्रिकेटपटूने 11 कसोटी सामनेही खेळले आहेत आणि 4 अर्धशतकेही झळकावली आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.