Mukesh Kumar : वन डे डेब्यू करणाऱ्या मुकेश कुमारने रचला महारेकॉर्ड, मोठ्या खेळाडूंच्या यादीत एन्ट्री!

Mukesh Kumar Record : भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या दमदार कामगिरीपुढे कॅरेबियन संघाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.  या सामन्यामध्ये मुकेश कुमार याने पदार्पण केलं आणि खास यादीत स्थान मिळवलं आहे.

Mukesh Kumar : वन डे डेब्यू करणाऱ्या मुकेश कुमारने रचला महारेकॉर्ड, मोठ्या खेळाडूंच्या यादीत एन्ट्री!
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 10:28 PM

मुंबई : वेस्ट इंडिज आणि टीम इंडिया यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात कॅरेबियन संघाचा बाजा वाजवला आहे. रोहित शर्माने टॉस जिंंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या दमदार कामगिरीपुढे कॅरेबियन संघाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.  या सामन्यामध्ये मुकेश कुमार याने पदार्पण केलं आणि खास यादीत स्थान मिळवलं आहे.

बिहारच्या गोपाळगंजचा असणाऱ्या मुकेश कुमारने वनडेमध्ये पदार्पण केलं. याआधी कसोटी सामन्यामध्ये मुकेश कुमारला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये कमी वेळात पदार्पण करण्याच्या यादीत मुकेशने स्थान मिळवलंय. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मुकेशने कारकिर्दीतील पहिल्या कसोटी सामन्यात 2 विकेट घेतल्या होत्या.

सर्वात कमी वेळात दोन क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये पदार्पण करणाच्या यादीत मुकेश कुमार दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीमध्ये 1981 मध्ये श्रीकांत यांनी दोन दिवसांमध्ये दोन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांच्यानंतर भारत अरुण (1986), नीलेश कुलकर्णी (1997) आणि आता मुकेश कुमार (2023) यांनी 7-7 दिवसांच्या अंतराने 2 फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं होतं.

मुकेश कुमारला आजच्या सामन्यात रविंद्र जडेजाने त्याला डेब्यू कॅप दिली. विशेष म्हणजे मुकशे कुमारला जी विकेट मिळाली तो कॅचसुद्धा जडेजानेच घेतला. मुकेश कुमारने 5 ओव्हर टाकल्या यामधील 1 ओव्हर त्याने मेडन टाकत 1 विकेट घेतली.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (C & W), कायले मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स आणि गुडाकेश मोती.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (W), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.