India vs West Indies 1st ODI : जडेजा-कुलदीप फिरकी जोडीसमोर विंडिजची शरणागती, 5 विकेट्सने शानदार विजय!
India vs West Indies 1st ODI : कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा या फिरकी जोडीसमोर तगड्या कॅरेबियन संघाने गुडघे टेकले. पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये कॅरेबियन संघाचा 5 विकेट्सने पराभव झाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेमधील पहिला सामना जिंकत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
मुंबई : वेस्ट इंडिज आणि टीम इंडियामधील पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये कॅरेबियन संघाचा 5 विकेट्सने पराभव झाला आहे. नाणेफेक जिंकत टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा या फिरकी जोडीसमोर तगड्या कॅरेबियन संघाने गुडघे टेकले. वेस्ट इंडिजचा संघ 114 वर ऑल आऊट झाला होता. त्यानंतर टीम इंडियाने 23 व्या ओव्हरमध्ये हे लक्ष्य पूर्ण करत मालिकेतील पहिला सामना खिशात घातला.
सामन्याचा आढावा-
वेस्ट इंडिजचा संघ पहिल्यांदा बॅटींगला उतरला होता. मात्र सलामीवीर कायले मेयर्स, ब्रँडन किंग यांना चांगली सुरूवात करू देता आली नाही. हार्दिक पंड्याने कायले मेयर्सला आऊट करत पहिली विकेट 7 धावांवर घेतली. त्यानंतर कर्णधार शाई होप याला वगळता कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. वेस्ट इंडिजच्या सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. मुकेश कुमार 1, शार्दुल ठाकूर1, रविंद्र जडेजा 3 आणि कुलदीप यादव 4 विकेट्स घेत कॅरेबियन संघाला 144 धावांवर रोखलं होतं.
टीम इंडिया या लक्ष्याचा पाठालाग करण्यासाठी मैदानात उतरल्यावर बॅटींग लाईनअपमध्ये बदल पाहायला मिळाला. सलामीला ईशान किशन आणि शुभमन गिल दोघे आले होते. मात्र गिल लवकर बाद झाला, त्यानंतर रोहित येईल असं सर्वांना वाटलं होतं. मात्र टीम मॅनेजमेंटने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मागे ठेवत युवा खेळाडूंना संधी दिली. परंतु कोणालाही मैदानावर टिकत संघाल विजय मिळवून देता आला नाही.
शुभमन गिल (7) बाद झाल्यावर आलेल्या सूर्यकुमार यादव (19), शार्दुल ठाकूर (1), हार्दिक पांड्या (5) बाद झाल्यानंतर अखेर रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. तीन सामन्यांच्या मालिकेमधील पहिला सामना जिंकत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायले मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स आणि गुडाकेश मोती.