IND vs WI 2nd ODI : दहा वर्षांनंतर पठ्ठ्याची संघात एन्ट्री पण रोहितकडून अजूनही ‘रेड सिग्नल’, पाहा कोण

IND vs WI 2nd ODI : येत्या वर्ल्ड कप 2023 च्या पार्श्वभूमीवर टीम मॅनेजमेंट अनेक बदल करत असलेलं पाहायला मिळत असून याची प्रचिती पहिल्या सामन्यामध्ये आली. मात्र पूर्ण स्क्वॉडमध्ये असा खेळाडू आहे ज्याने 10 वर्षांनी संघाता कमबॅक केलं आहे. परंतु त्याला अजून काही रोहित शर्माकडून हिरवा सिग्नल काही मिळाला नाही. 

IND vs WI 2nd ODI : दहा वर्षांनंतर पठ्ठ्याची संघात एन्ट्री पण रोहितकडून अजूनही 'रेड सिग्नल', पाहा कोण
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 9:52 AM

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वन डे सामना आज शनिवारी संध्याकाळी होणार आहे. आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवत टीम इंडियाचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसरीकडे यजमान कॅरेबियन संघासाठी ‘आज करो या मरो’ अशी परिस्थिती असणार आहे. येत्या वर्ल्ड कप 2023 च्या पार्श्वभूमीवर टीम मॅनेजमेंट अनेक बदल करत असलेलं पाहायला मिळत असून याची प्रचिती पहिल्या सामन्यामध्ये आली. कर्णधार रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर खेळायला उतरला होता. मात्र पूर्ण स्क्वॉडमध्ये असा खेळाडू आहे ज्याने 10 वर्षांनी संघाता कमबॅक केलं आहे. परंतु त्याला अजून काही रोहित शर्माकडून हिरवा सिग्नल काही मिळाला नाही.

कोण आहे तो खेळाडू?

रोहित शर्माने मागील सामन्यात कुलदीप यादवला आणि उमरान मलिक यांना संधी दिली. तर सलामीला ईशान किशन आणि शुबमन गिल यांना पाठवण्याचा निर्णय घेतला. ईशानने खरा संधीचा फायदा घेतला आणि अर्धशतक करत संघाच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. तर शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आलं. अखेर रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी संघाच्या विजयावर शिक्कमोर्तब केलं.

रोहित शर्माने युवा खेळाडूंना संधी दिली पण 10 वर्षांनी संघात आलेल्या जयदेव उनाडकट याला प्लेईंग 11 मध्ये त्याला काही स्थान दिलं नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत निवडकर्त्यांचं लक्ष वेधणाऱ्या जयदेवला अद्याप वनडे मध्ये काही संधी मिळाली नाही. जयदेवने शेवटचा वनडे सामना 2013 साली वेस्ट इंडिजविरुद्ध कोची येथे खेळला होता.

दरम्यान, कसोटीमध्येही जयदेव उनाडकटने 12 वर्षांनी कमबॅक केलं होतं. आताच झालेल्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळाली होती. आता वनडे क्रिकेटमध्ये परत एकदा त्याला मैदानात उतरण्यासाठी रोहितकडून ग्रीन सिग्नल मिळतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.