IND vs WI 2nd ODI : दुसऱ्या सामन्यात रोहितच्या हुकमी खेळाडूचा पत्ता कट, संजूची होणार संघात एन्ट्री?
वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम मॅनेजमेंट असे प्रयोग करत आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण संजू सॅमसन याला संघात आता स्थान दिलं जावू शकतं. त्यामुळे आता संघातील कोणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील दुसरा एकदिवसीय सामना आज म्हणजेच शनिवारी संध्याकाळी सात वाजता होणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये रोहित शर्मा अँड कंपनीने वेस्ट इंडिज संघावर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यामध्ये टीम इंडियाने बॅटींग लाईनअपमध्ये बदल केलेला पाहायला मिळाला होता. वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम मॅनेजमेंट असे प्रयोग करत आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण संजू सॅमसन याला संघात आता स्थान दिलं जावू शकतं. त्यामुळे आता संघातील कोणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दुसरा एकदिवसीय सामना केंसिंग्टन ओव्हल बार्बाडोस येथे होणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर संजू सॅमसनने अनेकवेळा संघात स्थान मिळवलं आहे. मात्र तो कायम आत-बाहेर असलेला पाहायला मिळाला. त्यामुळे आता त्याला कधी संधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आजच्या सामन्यात ईशान किशनला बाहेर करता येणार नाही कारण मागील सामन्यात त्याने अर्धशतक मारत आपली जागा पक्की केली आहे.
या खेळाडूचा पत्ता होणार कट?
जर ईशान किशनला बाहेर करता येणार नाही मग संजू सॅमसनला संधी कशी मिळणार? दुसऱ्या सामन्यामध्ये संजूची जर्सी खेळून मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार यादव याच्या जागी त्याला संघात एन्ट्री मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सूर्याला संघाचा भाग बनवण्यासाठी त्याला अनेकवेळा संधी दिली गेली आहे. मात्र अजुनही सूर्याला म्हणावी तशी कामगिरी करता आलेलं नाही.
टीम इंडियाचा मिस्टर 360 प्लेअर म्हणून ओखळला जाणारा सूर्या सलग 16 डावांमध्ये फेल गेलेला दिसला आहे. पहिल्या वनडे सामन्यातही सूर्या 19 धावा करून बाद झाला. तिसऱ्या स्थानी त्याला संधी मिळूनही त्याला फार काही चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात सूर्याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळू शकते.