IND vs WI 2nd ODI : दुसऱ्या सामन्यात कोणते प्लेयर्स ठरतील लकी, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर तपशील
पहिल्या वनडे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला पराभूत करत विजयी आघाडी घेतली. या सामन्यात कुलदीप यादव महत्त्वाचा खेळाडू ठरला. दुसऱ्या वनडे कोणते खेळाडू बाजी फिरवू शकतात ते जाणून घ्या.
मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि इशान किशन हे खेळाडू महत्त्वाचे ठरले होते. आता दुसऱ्या सामन्यात कोणते खेळाडू लकी ठरतील. याचा अंदाज बांधला जात आहे. पहिल्या वनडेतील पराभवानंतर वेस्ट इंडिजमध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. तर भारतीय संघातही बदल केले जाऊ शकतात. त्याचबरोबर खेळपट्टी कोणत्या खेळाडूंसाठी पूरक आहे यावरूनही अंदाज बांधता येऊ शकतात. सर्वप्रथम खेळपट्टीबाबत जाणून घेऊयात.
पिच रिपोर्ट
कॅरेबियन बेटांवरील केन्सिंगटोन ओव्हल मैदान हे गोलंदाजासाठी पूरक आहे. खासकरून वेगवान गोलंदाजांना ही खेळपट्टी मदत करणारी आहे. मैदानात सुरुवातील चेंडू स्विंग होतो आणि शेवटी रिव्हर स्विंग पाहायला मिळतो. मागच्या पाच सामन्यात वेगवान गोलंदाजांनी 38 पैकी 21 गडी बाद केले आहेत. त्यामुळे फलंदाजांना काळजीपूर्वक बॅटिंग करावी लागेल. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. पहिल्यांदा फलंदाजी करताना 205 धावांपर्यंत मजल मारता येईल.
हे खेळाडू महत्त्वाचे ठरू शकतात
- कर्णधार – कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रोहित शर्मा
- टॉप खेळाडू- विराट कोहली, शाय होप, इशान किशन
- चांगली कामगिरी करू शकतील असे खेळाडू- हार्दिक पांड्या, मुकेश कुमार, शार्दुल ठाकुर
- फॉर्मात नसलेले खेळाडू- कायल मेयर्स, रोव्हमॅन पोव्हेल
अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
वेस्ट इंडिज : ब्रँडन किंग, कायल मेयर्स, एलिक अथान्झे, शाय होप (कर्णधार/विकेटकीपर), शिम्रॉन हेटमायर, रोव्हमॅन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, डोमिनिक ड्रेक्स, यान्निक करियाह, गुडाकेश मोती, जेयडेन सील्स
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, इशान किशन, मुकेश कुमार, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट/उमरान मलिक