IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजचा दुसऱ्या सामन्यात विजय, टीम इंडियाचे युवा खेळाडू ठरले कागदी ‘वाघ’
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झालेला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना १८२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. वेस्ट इंडिजने हे लक्ष्य ३७ व्या ओव्हरमध्ये पूर्ण करत टीम इंडियावर विजय मिळवला आहे.
मुंबई : वेस्ट इंडिज आणि टीम इंडियामधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये कॅरेबियन संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीचा संघाला मोठा फटका बसला आहे. टीम इंडियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १८२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. वेस्ट इंडिजने हे लक्ष्य ३७ व्या ओव्हरमध्ये पूर्ण करत टीम इंडियावर विजय मिळवला आहे.
सामन्याचा संपूर्ण आढावा
वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार शाई होप याने घेतला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली बाहेर बसले होते. शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये ईशान किशन आणि शुबमल गिल यांनी चांगली सुरूवात करून दिली होती. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या एकाही युवा खेळाडूला मैदानावर तग धरता आला नाही. ईशान किशन याने सर्वाधिक ५५ धावा केल्या. सलग दुसऱ्या सामन्यात ईशानने अर्धशतक केलं आहे.
शुबमन गिल ३४ धावा, संजू सॅमसन ०९ धावा, हार्दिक पांड्या ०७ धावा, सूर्यकुमार यादव २४ धावा, रवींद्र जडेजा १० धावा, अक्षर पटेल ०१ धावा काढून स्वस्तात बाद झाले. महत्त्वाचे खेळाडू बाद झाल्याने टीम इंडियाचा डाव १८१- १० वर आटोपला.
वेस्ट इंडिज संघ या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यावर ब्रँडन किंग १५ धावा, काइल मेयर्स ३६ धावा या दोघांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांना सुरूवातीला काही विकेट मिळवून दिली नाही. शार्दुल ठाकूरने तीन जणांना बाद करत विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र कर्णधार शाई होप नाबाद ६३ आणि केसी कार्टी नाबाद ४८ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने ३ आणि कुलदीप यादवने १ विकेट घेतली. मात्र इतर कोणत्याही गोलंदाजांना यश मिळालं नाही.
दरम्यान, टीम इंडियाचा दुसऱ्या कसोटी सामन्यामध्य पराभव झाल्याने आता मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे आता तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण जो संघ मालिका जिंकेल तो मालिक जिंकणार आहे.
वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, काइल मेयर्स, अॅलिक अथनाझे, शाई होप (W/C), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, इशान किशन (W), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (C), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार