IND vs WI 2nd T20: दुसऱ्या सामन्यात हे खेळाडू ठरतील बाजीगर! प्लेइंग इलेव्हन आणि पिच रिपोर्ट जाणून घ्या

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या सामन्यासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे.

IND vs WI 2nd T20: दुसऱ्या सामन्यात हे खेळाडू ठरतील बाजीगर! प्लेइंग इलेव्हन आणि पिच रिपोर्ट जाणून घ्या
IND vs WI 2nd T20: दुसऱ्या सामन्यात या खेळाडूंवर अशी नजर, वाचा प्लेइंग इलेव्हन आणि पिच रिपोर्ट
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 6:54 PM

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी20 सामना गुयानाच्या पोव्हिडन्स स्टेडियममध्ये रंगणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला 4 धावांनी पराभूत केल्याने वेस्ट इंडिज संघाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. तर दुसऱ्या सामन्यातून कमबॅक करण्याची टीम इंडियाची धडपड असेल. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरेल याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कोणते खेळाडू हा सामना पलटवून लावतील याबाबतही चर्चा रंगली आहे. यातील काही खेळाडू तुमच्या नशिबाचं दार उघडं करून देऊ शकतात. त्यामुळे सामन्याची वेळ, पिच रिपोर्ट आणि प्लेइंग इलेव्हनबाबत सर्वकाही जाणून घ्या आणि तुमचं तुम्ही ठरवा…

पिच रिपोर्ट

गुयानातील पोव्हिडन्स मैदान हे फलंदाज आणि गोलंदाज यांना पुरक असं आहे. त्यामुळे गोलंदाज आणि फलंदाज आपली कामगिरी सिद्ध करू शकतात. आतापर्यंत या मैदानात झालेल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभी राहिली आहे. त्यामुळे या सामन्यातही एखाद्या खेळाडूकडून चांगल्या धावा होऊ शकतात. तसेच ही खेळपट्टी स्विंग गोलंदाजांना मदत करणारी आहे. तसेच फिरकीपटूंचा विचार करता येथे हलका स्पिन होऊ शकतो. पण फलंदाजांना याचा फायदा होईल असंच चित्र आहे.

कोणते खेळाडू ठरतील बाजीगर

  • निकोलस पूरन
  • तिलक वर्मा
  • युजवेंद्र चहल

पहिल्या सामन्यात जेसन होल्डर, तिलक वर्मा, रोव्हमन पॉवेल, निकोलस पूरन, युजवेंद्र चहल यांनी चांगली कामगिरी केली होती. पण सामन्याची स्थिती प्रत्येक वेळी तशीच असेल असं सांगता येत नाही. त्यामुळे कोणता खेळाडू कधी चमकेल? हे त्या त्या वेळी दिसून येईल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत : इशान किशन (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार

वेस्ट इंडिज : कायल मायर्स, ब्रँडन किंग, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिम्रॉन हेटमायर, रोव्हमॅन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेड मॅककॉय

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.