IND vs WI 3rd ODI : विंडिजविरूद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडिया काढणार धोनीचं ‘हे’ ब्रह्मास्त्र?

IND vs WI 3rd ODI | मालिकेतील अखेरचा सामना जिंकण्यासाठी विराट आणि रोहित संघात परतणार हे निश्चितच आहे. मात्र आणखी एक मोठा बदल म्हणजे टीम मॅनजमेंट कॅरेबियन संघाला रोखण्यासाठी ब्रह्मास्त्र काढण्याच्या तयारीत आहे. 

IND vs WI 3rd ODI : विंडिजविरूद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडिया काढणार धोनीचं 'हे' ब्रह्मास्त्र?
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 8:19 AM

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये आज मंगळवारी तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाला कॅरेबियन संघाला पराभूत करावं लागणार आहे. जर हा सामना जिंकला नाहीतर टीम इंडियासाठी हा पराभव एखाद्या जखमेवर मीळ चोळल्यासारखा असणार आहे. कारण यंदा भारतात वर्ल्ड कप भारताध्ये होणार असून टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जात आहे. परंतु इतका मजबूत संघ जर वर्ल्ड कपसाठी पात्र न ठरलेल्या विंडिजकडून पराभूत झाला तर हा पराभव जिव्हारी लागणारा ठरेल.

टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये अखेरच्या सामन्यामध्ये बदल पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली होती. मात्र टीम इंडियाचा पराभव झाला होता. त्यामुळे मालिकेतील अखेरचा सामना जिंकण्यासाठी विराट आणि रोहित संघात परतणार हे निश्चितच आहे. मात्र आणखी एक मोठा बदल म्हणजे टीम मॅनजमेंट कॅरेबियन संघाला रोखण्यासाठी ब्रह्मास्त्र काढण्याच्या तयारीत आहे.

ब्रह्मास्त्र म्हणजे टीम इंडियाचे दोन स्पिनर कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोघांनाही आजच्या सामन्यामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. दोघे जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा विरोधी संघाना अडचणीत टाकत असल्याचं पाहायला मिळायंच. महेंद्र सिंग धोनी संघाचा कर्णधार असताना दोघांना एकदम व्यवस्थितपणे वापरून विकेट मिळवायचा. २०१७ चॅम्पियन ट्रॉफीपासून ते २०१९ च्या वर्ल्ड कपपर्यंत या जोडीने दमदार कामगिरी केली होती.

दरम्यान, काही दिवसांनंतर दोघेही संघातून वगळले गेले आणि ही जोडी फुटली गेली. आता वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यामध्ये दोघांना रोहितने संधी दिली तर ते नक्की कॅरेबियन संघाला गुडघे टेकवण्यासाठी भाग पाडू शकतात.

आजच्या सामन्यात या खेळाडूंना मिळणार डच्चू?

संजू सॅमसन याला संधी देऊनही त्याला सोनं करता आलं नाही. त्यानंतर एकदिवसीय फॉरमॅटमध्ये अपयशी ठरत असलेल्या सूर्यकुमार यादवलाही दोन सामन्यांमध्ये काही विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे या दोन खेळाडूंना बाहेर काढण्याची जास्त शक्यता आहे. यासोबतच मागील सामन्यामधील पदार्पणवीर मुकेश कुमार याच्या जागी जयदेव उनाडकट याला संधी दिली जावू शकते. दोन्ही संघ आपली सर्व ताकद पणाला लावतील आणि सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करतील.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....